गेटगोइंगतर्फे मॅरेथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:49 AM2018-01-12T00:49:35+5:302018-01-12T00:49:47+5:30
गत आठ वर्षांपासून औरंगाबादमधील महिलांना आपल्या आरोग्याप्रती जागरूक करण्याचे कार्य करीत असणाºया गेटगोइंग या संस्थेतर्फे ४ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद : गत आठ वर्षांपासून औरंगाबादमधील महिलांना आपल्या आरोग्याप्रती जागरूक करण्याचे कार्य करीत असणाºया गेटगोइंग या संस्थेतर्फे ४ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
धावण्याचा व्यायाम सुरू करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयोजित करण्यात येणारी ही मॅरेथॉन ३ कि.मी., ५ कि.मी. आणि १० कि.मी. अंतराची असणार आहे. ५ व १० कि.मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये टायमिंग चिपचा उपयोग केला जाणार आहे. ‘रन विथ हर’ हे घोषवाक्य असणाºया या मॅरेथॉनला ४ फेब्रुवारी रोजी कलाग्राम येथून सकाळी ६ वाजता प्रारंभ होणार असून, तेथेच तिचा समारोप होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये स्त्रिया स्वत:ची नोंदणी करू शकतात. मात्र, पुरुष स्पर्धकांना त्यांच्यासोबत आई, बहीण, बायको, मैत्रीण व सहकारी या रूपात नोंदणी करता येणार आहे. ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी गेटगोइंग कोअर कमिटीच्या डॉ. उमा महाजन, डॉ. नीती सोनी, डॉ. चारुशीला देशमुख, डॉ. प्रिया देशमुख, निना निकाळजे, डॉ. सुजाता लाहोटी, डॉ. संतोष तोतला, डॉ. संगीता देशपांडे, डॉ. भावना लोहिया, दीपाली डबरी, डॉ. वंदना मिश्रा, निरुपमा नागोरी, दीप्ती खेमका आदी परिश्रम घेत आहेत.