शहरातून दीड तासांत गाठा बंगळुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:39+5:302020-12-17T04:33:39+5:30
औरंगाबाद : औरंगाबादहून इंडिगोच्या बंगळुरू विमानसेवेला बुधवारी (दि.१६) सुरुवात झाली. या विमानसेवेमुळे दीड तासांत बंगळुरू गाठणे शक्य झाले आहे. ...
औरंगाबाद : औरंगाबादहून इंडिगोच्या बंगळुरू विमानसेवेला बुधवारी (दि.१६) सुरुवात झाली. या विमानसेवेमुळे दीड तासांत बंगळुरू गाठणे शक्य झाले आहे. पहिल्याच दिवशी बंगळुरूहून ९० प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले, तर औरंगाबादहून ९२ प्रवासी बंगळुरूला रवाना झाले. या एका विमानसेवेमुळे औरंगाबादला बंगळुरूबरोबर चैन्नईला हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.
शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरू येथे शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते. कोरोनामुळे ही सेवा खंडित झाली होती. बंगळुरू गाठण्यासाठी पूर्वी रस्तेमार्गाने, अथवा मुंबई, पुण्यातून विमानाने जावे लागत होते. परंतु, आता या विमानसेवेमुळे विद्यार्थी उद्योजक, व्यावसायिकांचा प्रवास जलद होणार आहे. या सेवेत सातत्य राहण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
माहिती व तंत्रज्ञान उद्योगाला चालना
माहिती व तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रालाही या विमानसेवेचा फायदा होणार आहे. हे उद्योग शहरात वाढीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पहिल्या दिवशी ९० प्रवासी औरंगाबादेत आले आणि ९२ प्रवासी औरंगाबादहून बंगळुरूला गेल्याची माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.