राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्र संघाचा पुण्यात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:45 PM2018-01-24T23:45:30+5:302018-01-24T23:45:58+5:30
हैदराबाद येथे ६४ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावणाºया महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा २७ जानेवारी रोजी पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनंतर महाराष्ट्राला विजेतेपदाची चव चाखता आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
औरंगाबाद : हैदराबाद येथे ६४ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावणाºया महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा २७ जानेवारी रोजी पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनंतर महाराष्ट्राला विजेतेपदाची चव चाखता आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या गौरव सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्राच्या विजेत्या कबड्डी संघातील प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकाला प्रत्येकी ५१ हजार रुपये व ब्लेझर देण्यात येणार आहे. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघात रिशांक देवाडिगा (कर्णधार), विकास काळे, सचिन शिंगाडे, गिरीश इर्नाक, विराज लांडगे, नितीन मदने, तुषार पाटील, नीलेश साळुंखे, ऋतुराज कोरवी, सिद्धार्थ देसाई, अजिंक्य कापरे, रवी ढगे यांचा सहभाग होता. प्रशिक्षक म्हणून औरंगाबाद येथील एनआयएस कोच डॉ. माणिक राठोड आणि व्यवस्थापक म्हणून फिरोज पठाण होते. या सोहळ्यात इराण येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देणाºया महाराष्ट्रातील अभिलाषा म्हात्रे (कर्णधार) व सायली जाधव यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याचेही किशोर पाटील यांनी सांगितले. हा सोहळा महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि राज्य कबड्डी संघटनेचे आश्रयदाते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मुंबई कबड्डी उपनगर संघटनेचे अध्यक्ष गजानन कीर्तीकर, सुनील तटकरे यांची उपस्थिती असणार आहे.