'गौरव यात्रा सन्मानाची,वज्रमूठ सभा अवमानाची'; भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचा दावा

By शांतीलाल गायकवाड | Updated: April 1, 2023 13:51 IST2023-04-01T13:49:43+5:302023-04-01T13:51:47+5:30

सच्चा हिंदूत्ववादी महाविकास आघाडीच्या सभेला जाणार नाही

'Gaurav Yatra is honor, Vajramut Sabha is contempt'; BJP-Shinde group leaders claim | 'गौरव यात्रा सन्मानाची,वज्रमूठ सभा अवमानाची'; भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचा दावा

'गौरव यात्रा सन्मानाची,वज्रमूठ सभा अवमानाची'; भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर: आम्ही महापुरूषांच्या गौरवासाठी यात्रा काढत आहोत. तर ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर हिंदूऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वाचा हुंकार भरला त्याच मैदानावर उद्या महाविकास आघाडीची सभा होत असून तो बाळासाहेबांचा अवमान आहे, अशी टिका केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपाचे नेते व पालक मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी शनिवारी पत्रकार परिषदेत एकसुरात केली.

डॉ. कराड म्हणाले, कॉग्रेस नेते राहूल गांधी हे सतत स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचा अवमान करत असून त्यांचा निषेध आम्ही नोंदविला आहेच. सोबतच सावरकरांचे ज्वाजल्य देशप्रेम व हिंदूत्वाची सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी भाजपा व शिवसेनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा रविवारी सायंकाळी शहरातून काढण्यात येणार आहे. समर्थनगरातील सावरकर यांच्या पुतळ्यास वंदन करून या यात्रेस सुरवात होईल.
पत्रकार परिषदेला मराठवाडा यात्रा प्रमुख संजय केणेकर व आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह सहकार मंत्री अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, डॉ. राम बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाकरेंनी सावरकरांना वंदन करण्यास यावे- पालकमंत्री
सावरकरांचा अवमान करणाऱ्या काॅग्रेस नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावले आहे. त्यांनी उद्या गौरव यात्रेत येऊन सावरकरांना अभिवादन करावे, आम्ही त्यांचे स्वागत करू. येतांना त्यांच्या दोन्ही सहकारी पक्षासही घेऊन यावे, असा चिमटाही पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी काढला.

हे दुर्देवच म्हणावे: केणेकर
जे मैदान बाळासाहेबांनी गाजवले. तेथे गर्दीचे विक्रम केले. त्यांचे विक्रम काॅग्रेस व राष्ट्रवादीना सोबत घेऊन उद्धव ठाकरे मोडणार आहेत, हे दुर्देवच म्हणावे, अशी टिका भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी केले.

Web Title: 'Gaurav Yatra is honor, Vajramut Sabha is contempt'; BJP-Shinde group leaders claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.