जनरल तिकीट बंदच; स्पेशल ट्रेनमध्ये आरक्षित बोगींमध्ये फुकट्या प्रवाशांचीच संख्या जास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 07:14 PM2021-11-10T19:14:15+5:302021-11-10T19:21:11+5:30

जनरल तिकीट बंदच, ‘एसटी‘ची सेवा ठप्प, प्रवास कसा करायचा? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.

General ticket closed; The number of free passengers in bogies reserved in special trains is high! | जनरल तिकीट बंदच; स्पेशल ट्रेनमध्ये आरक्षित बोगींमध्ये फुकट्या प्रवाशांचीच संख्या जास्त !

जनरल तिकीट बंदच; स्पेशल ट्रेनमध्ये आरक्षित बोगींमध्ये फुकट्या प्रवाशांचीच संख्या जास्त !

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबादमार्गे सध्या केवळ स्पेशल ट्रेन धावत आहेत. यातील बहुतांश रेल्वेगाड्यांना केवळ आरक्षणाच्या बोगी आहेत. जनरल बोगी आणि जनरल तिकिटाची सुविधा अद्यापही दिलेली नाही. त्यामुळे आरक्षित बोगीतून गरजेमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, जनरल बोगी, जनरल तिकिटाची सुविधा देणार नसाल, तर सर्वसामान्यांनी प्रवास कसा करावा, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रवाशांची सर्वाधिक गर्दी राहणाऱ्या नंदीग्राम, तपोवन, देवगिरी, जनशताब्दी, मराठवाडा एक्स्प्रेसला जनरल तिकिटाची सुविधा दिलेली नाही. रेल्वेचे तिकीट आरक्षित केलेले असेल तरच प्रवास करता येत आहे. दिवाळी सुट्यांमुळे रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. त्यात जनरल तिकीटही मिळत नाही. एसटीची बससेवा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली आहे. अशा वेळी अनेक प्रवासी थेट विनातिकीट प्रवास करीत आहे. मात्र, आरक्षित बोगीतून विनातिकीट प्रवासी सापडल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले, रेल्वेगाड्यांना तात्काळ जनरल बोगी जोडून जनरल तिकिटाची सुविधा देण्याची गरज आहे.

रात्रीच्या वेळी रेल्वे खचाखच
दिवाळीच्या सुट्यांनंतर परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे भरून जात आहेत. सचखंड, तपोवन, मराठवाडा एक्स्प्रेससह दिवसा धावणाऱ्या बहुतांश रेल्वेचे आरक्षण फुल आहे. रात्रीच्या वेळी धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसला प्रवाशांची सर्वाधिक गर्दी आहे.

रोज २०० फुकट्यांवर कारवाई
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दररोज साधारण २०० विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. ८ नोव्हेंबर रोजी दिवसभरात १९९ जणांवर कारवाई करून तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेतून उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर तिकीट निरीक्षकांची नजर असते.

सध्या सुरू असलेल्या काही स्पेशल ट्रेन
- जनशताब्दी एक्स्प्रेस
- सचखंड एक्स्प्रेस
- तपोवन एक्स्प्रेस
- नंदीग्राम एक्स्प्रेस
- देवगिरी एक्स्प्रेस
- राज्यराणी एक्स्प्रेस
- मराठवाडा एक्स्प्रेस
- औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस

Web Title: General ticket closed; The number of free passengers in bogies reserved in special trains is high!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.