प्रतिभा सर्वांकडेच, गरज पैलू पाडण्याची

By Admin | Published: March 15, 2016 12:41 AM2016-03-15T00:41:46+5:302016-03-15T00:41:46+5:30

औरंगाबाद : ‘प्रतिभा सर्वांकडेच असते. मात्र, पैलू पाडून तिला आणखी चमकदार करण्याची सद्य:स्थितीत गरज आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी येथे केले.

Genius, all in need | प्रतिभा सर्वांकडेच, गरज पैलू पाडण्याची

प्रतिभा सर्वांकडेच, गरज पैलू पाडण्याची

googlenewsNext


औरंगाबाद : ‘प्रतिभा सर्वांकडेच असते. मात्र, पैलू पाडून तिला आणखी चमकदार करण्याची सद्य:स्थितीत गरज आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी येथे केले.
‘आयपीसीसी’, ‘सीपीटी’ आणि ‘सीए’ अंतिम परीक्षेतील गुणवंतांचा ‘लोकमत’तर्फे सत्कार करण्यात आला. ‘लोकमत भवन’ मध्ये झालेल्या गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, संपादक चक्रधर दळवी, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला, सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई, सहायक उपाध्यक्ष (फायनान्स) शैलेश चांदीवाल, ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, व्यवस्थापक (लेखा व वित्त) अंबरिश श्रॉफ, ‘आयसीएआय’च्या पश्चिम विभागाचे सदस्य उमेश शर्मा, औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षा रेणुका देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सीए’ अंतिम परीक्षेतील २२, ‘आयपीसीसी’च्या २४, तर ‘सीपीटी’च्या २०० गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला.
‘प्रतिभा ही सर्वांकडेच असते, परंतु त्यावर पैलू पाडण्याची गरज आहे. आपल्याला कोणत्याही विषयातील तज्ज्ञ व्हायचे नाही, तर परीक्षेच्या तीन तासांत समोर येणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याची आहे. परीक्षेच्या कालावधीत आपल्यातील प्रतिभेचा योग्य प्रकारे उपयोग करणारे विद्यार्थीच यशस्वी होतात,’ असा मोलाचा सल्ला बकोरिया यांनी दिला.
मुलींचे वाढते प्रमाण समाधानकारक
मनपा आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’ समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची बकोरिया यांची ही पहिलीच वेळ होती.‘लोकमत’ समूहाच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. सीए, सीपीटी आणि आयपीसीसी परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांत मुलींचे वाढते प्रमाण समाधानकारक आहे. स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता ‘एज्युकेशन हब’ बनण्याची औरंगाबादमध्ये क्षमता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कठोर मेहनत आणि आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला ‘सीए’ उमेश शर्मा यांनी दिला. ‘लोकमत’कडून या विद्यार्थ्यांचा गौरव होणे ही मोठी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. रेणुका देशपांडे यांनीही गुणवंतांचे कौतुक केले. ओमप्रकाश केला यांनी प्रास्ताविक केले. संदीप विष्णोई यांनी आभार मानले.
देशाला महासत्ता बनविण्यात चार्टर्ड अकाऊंटंटचा सिंहाचा वाटा असेल, असे गौरवोद्गार राजेंद्र दर्डा यांनी काढले. ‘डीएमआयसी’ प्रकल्पामुळे भविष्यात ‘सीएं’ची मोठी गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत ‘सीए’ना ‘सोल्युशन प्रोव्हायडर’ म्हणून काम करावे लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. या अभ्यासक्रमात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Genius, all in need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.