...आपला आदर, प्रेम सांभाळण्याची शक्ती मिळो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:01 AM2018-02-11T00:01:12+5:302018-02-11T00:01:19+5:30

आपले प्रेम, आदर सांभाळण्याची शक्ती भावी जीवनात मिळावी, असे भावोद्गार सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग, नो मीट इटिंग, सत्तरीपर्यंत योगासने, हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे भुजंगराव यांनी सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केले.

... Get the strength to guard your respect and love | ...आपला आदर, प्रेम सांभाळण्याची शक्ती मिळो

...आपला आदर, प्रेम सांभाळण्याची शक्ती मिळो

googlenewsNext
ठळक मुद्देभुजंगराव कुलकर्णी यांचे भावोद्गार : ‘आनंदोत्सव’ उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आपले प्रेम, आदर सांभाळण्याची शक्ती भावी जीवनात मिळावी, असे भावोद्गार सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग, नो मीट इटिंग, सत्तरीपर्यंत योगासने, हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे भुजंगराव यांनी सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केले.
सेवानिवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांच्या शताब्दीपूर्तीनिमित्त शनिवारी भानुदास चव्हाण सभागृहात ‘आनंदोत्सव’पार पडला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते भुजंगराव कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला, तर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते ‘मी, मराठवाडा आणि महाराष्ट्र’ या त्यांच्या आत्मचरित्राचे विमोचन झाले. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी भुजंगराव म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे राजकीय नेते तर होतेच; पण महान प्रशासकीय नेतेही होते. त्यांनी आम्हाला नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी निवडले, हे सौभाग्य असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. पुरुषोत्तम भापकर, एस.बी. वºहाडे, या.रा. जाधव, डॉ. उत्तम काळवणे, राजाभाऊ धाट, राम भोगले, पद्माकर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंचावर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बॅरिस्टर जवाहरलाल गांधी, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस.बी. वराडे, उद्योजक राम भोगले, जलतज्ज्ञ या.रा. जाधव, डॉ. सुभाष झंवर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्यवाह राजाभाऊ धाट, ऊर्जा सहयोगचे अध्यक्ष डॉ. उत्तम काळवणे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रसिका देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभय कुलकर्णी यांनी आभार मानले.
विभागीय आयुक्तांना कानपिचक्या
यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना कानपिचक्या दिल्या. भुजंगराव यांच्या कार्याचा आदर्श घेऊन प्रशासनात कारभार केला पाहिजे. केवळ त्यांना शुभेच्छा न देता त्यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञानाची मदत घेत प्रशासनाला गती द्यावी, असेही बागडे यांनी भापकरांना उद्देशून म्हटले.
आयएएस प्रशिक्षण केंद्राला भुजंगरावांचे नाव द्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आयएएस प्रशिक्षण केंद्राला भुजंगरावांचे नाव द्यावे, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष आणि विभागीय आयुक्तांकडे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने केली.

Web Title: ... Get the strength to guard your respect and love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.