इंधन दरवाढ पडली अंगवळणी!

By Admin | Published: May 15, 2014 12:08 AM2014-05-15T00:08:31+5:302014-05-15T00:28:41+5:30

औरंगाबाद : केंद्र सरकारने सोमवारी मध्यरात्रीपासून डिझेलच्या दरात वाढ केली. परिणामी महागाई वाढेल.

Get used to fuel costs! | इंधन दरवाढ पडली अंगवळणी!

इंधन दरवाढ पडली अंगवळणी!

googlenewsNext

औरंगाबाद : केंद्र सरकारने सोमवारी मध्यरात्रीपासून डिझेलच्या दरात वाढ केली. परिणामी महागाई वाढेल. यापूर्वी विरोधी पक्षांकडून इंधन दरवाढीचा विरोध होत असे; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये दरवढीचा निषेध, विरोध करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. वेळोवेळी होणारी ही दरवाढ आता विरोधकांसह सर्वसामान्यांच्याही अंगवळणी पडली आहे. देशभरात डिझेलच्या किमतीत १ रुपया ९ पैशांची वाढ झाली. ही दरवाढ स्थानिक कर वगळून असून करांचा हिशोब करता विभागनिहाय डिझेलच्या किमतीत दीड रुपयापर्यंत वाढ झाली आहे. जानेवारी २०१३ पासून आतापर्यंत डिझेलच्या दरात ८ रुपयांनी वाढ झाली आहे. यामध्ये शहरात मंगळवारपासून डिझेलच्या दरामध्ये १ रुपया ३६ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ६५.१९ रुपये प्रतिलिटरचा दर आता ६६.५५ रुपये झाला आहे. पेट्रोलच्या दरातही वेळोवेळी वाढ झाल्याचे दिसून आले. पेट्रोलियम पदार्थांची गरज वाढली आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात वाढ झाली म्हणजे त्याच्याशी निगडित असलेल्या सर्व वस्तूंच्या दरातही वाढ होते. वाहतूक व मालवाहतूक सेवांच्या भाववाढीला सामोरे जावे लागते. दैनंदिन जीवनातील अविभाज्य गरजांसाठी नागरिकांना जादा पैसे मोजावे लागतात. त्यामुळे इंधनाची दरवाढ एक प्रकारे महागाई वाढविण्यास हातभार लावत असल्याने दरवाढीस विरोध केला जातो. गृहिणींना बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. महिन्याचे बजेट कोलमडून पडत असल्याने मध्यमवर्गीयांकडून त्याचा निषेध केला जातो; परंतु गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलत असल्याचे दिसून येते. इंधन दरवाढ असो की, महागाई याचा निषेध करण्यासाठी रस्त्यांवर उतरणे, आंदोलन करण्याचे प्रमाण कमी होत आहे. होणारी दरवाढ विरोधी पक्षांसह सर्वसामान्यांच्या अंगवळणी पडलेली आहे. दुचाकीधारक वाळूज परिसरात भरतात पेट्रोल शहरातून वाळूज औद्योगिकनगरीत दुचाकी, चारचाकी वाहन घेऊन जाणारे अनेक वाहनधारक आहेत. शहरापेक्षा वाळूजमध्ये कमी किमतीत पेट्रोल मिळत असल्याने वाहनधारक तेथूनच पेट्रोल भरून शहरात येतात. याचाही परिणाम शहरातील पेट्रोल विक्रीवर झाला आहे. आजघडीला लिटरमागे १ रुपया ६२ पैसे वाळूजमध्ये कमी द्यावे लागतात. शहरात दररोज साडेतीन लाख लिटर पेट्रोल विक्री होत असे. सध्या यात ३० टक्क्यांनी घट झाली आहे. ग्रामीण भागातील वाहनधारकही मनपा हद्दीबाहेर पेट्रोल-डिझेल भरून शहरात वाहन घेऊन येतात. याचाही परिणाम येथील उलाढालीवर झाला आहे. विपरीत परिणाम राज्य शासनाला ३ लाख लिटर डिझेलवर ३ टक्क्यांनी महसूल वाढून मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, डिझेलची विक्री घटल्याने महसुलीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे तसेच महानगरपालिकेचा एलबीटीलाही याचा फटका बसला. शासनाकडे ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा शहराच्या रस्ते विकासापोटी डिझेल व पेट्रोलमधून मिळालेल्या अतिरिक्त महसुलापोटी शासनाकडे ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम मनपाला मिळाली नाही. दुसरीकडे एलबीटीचे उत्पन्न घटल्याने त्याचाही फटका मनपाला बसला आहे. डिझेलची निम्मी विक्री शहराबाहेर औरंगाबाद : महानगरपालिका हद्दीत डिझेलवर ४ टक्के, तर पेट्रोलवर २ टक्के अतिरिक्त टॅक्स भरावा लागतो. याचा मोठा परिणाम डिझेलच्या विक्रीवर झाला असून, शहरातील डिझेल विक्री निम्म्यावर येऊन ठेपली आहे. मनपातील रस्ते विकासाच्या नावाखाली शासनाच्या तिजोरीत अतिरिक्त महसूल जमा होत आहे; पण अजूनही त्यातील रक्कम मनपाला मिळाली नाही. एवढेच नव्हे तर डिझेलची विक्री घटल्याने त्याचा परिणाम एलबीटीवरही झाला आहे, असा दुहेरी फटका महानगरपालिकेला बसत आहे. केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने डिझेलच्या किमती नियंत्रणमुक्त करीत आहे. २० नोव्हेंबर २०१३ पासून दर महिन्याला डिझेलच्या किमतीत ५० पैसे वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मागील सात महिन्यांत डिझेलचा दर लिटरमागे ५ रुपये ८४ पैशांनी आहे, तर पेट्रोलचा दर ५४ पैशांनी वाढला. ८ जुलै २०११ पासून पेट्रोल ९ रुपये ६ पैसे, तर डिझेल २१ रुपये ५६ पैशांनी महागले. त्यात औरंगाबादेत महानगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेलवर १ टक्का एलबीटी आकारला जातो. याशिवाय औरंगाबादेतील रस्ते विकासासाठी राज्य शासन डिझेलवर ३ टक्के व पेट्रोलवर १ टक्का अतिरिक्त कर वसूल करीत आहे. आजघडीला शहरात पेट्रोल ८० रुपये २० पैसे, तर डिझेल ६६ रुपये ५५ पैसे प्रतिलिटर विक्री होत आहे. मनपा हद्दीबाहेर पेट्रोल ७८ रुपये ५८ पैसे, तर डिझेल ६४ रुपये १७ पैसे प्रतिलिटर विकले जात आहे. म्हणजेच शहरवासीयांना प्रतिलिटर पेट्रोलमागे १ रुपया ६२ पैसे, तर डिझेलमागे प्रतिलिटर २ रुपये ३८ पैसे अधिकचे मोजावे लागत आहेत. शहरातील वाहनधारकांना मनपा हद्दीबाहेर जाऊन पेट्रोल खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसले तरी कार, जीप, ट्रक, ट्रॅक्टर, एसटी बस, खाजगी बस यांना शहराबाहेरील पेट्रोल पंपावर डिझेल खरेदी करणे परवडत असल्याने त्याचा परिणाम शहरातील डिझेल विक्रीवर झाला आहे. यासंदर्भात पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी सांगितले की, दीड वर्षापूर्वी शहरात दररोज ३ लाख लिटर डिझेलची विक्री होत असे. मात्र, सद्य:स्थितीत ती केवळ दीड ते दोन लाख लिटरच होत आहे.

Web Title: Get used to fuel costs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.