पावणेआठ कोटींच्या कामांत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:35 AM2017-10-28T00:35:50+5:302017-10-28T00:35:55+5:30
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात रस्ते दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी इमारत, सामाजिक सभागृह, शाळा दुरुस्ती इ. तब्बल ७ कोटी ८५ लाख ८६ हजार ४४८ रुपयांच्या कामांमध्ये २०११-१२ या आर्थिक वर्षात अनियमितता झाल्याचा आक्षेप लेखापरीक्षणात नोंदविण्यात आला असून या विभागाने लेखापरीक्षणातील त्रुटी दूर करण्याकडे दुर्लक्ष केल्याची बाबही या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.
अभिमन्यू कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात रस्ते दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी इमारत, सामाजिक सभागृह, शाळा दुरुस्ती इ. तब्बल ७ कोटी ८५ लाख ८६ हजार ४४८ रुपयांच्या कामांमध्ये २०११-१२ या आर्थिक वर्षात अनियमितता झाल्याचा आक्षेप लेखापरीक्षणात नोंदविण्यात आला असून या विभागाने लेखापरीक्षणातील त्रुटी दूर करण्याकडे दुर्लक्ष केल्याची बाबही या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.
पंचायतराज समिती ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान परभणी जिल्ह्याच्या दौºयावर येत असल्याने या दौºयाची जिल्हा परिषद प्रशासनाने धसकी घेतली असून गेल्या वीस दिवसांपासून यासाठींच्या तयारीकरीता बैठकांचा रतीब सुरु आहे. पंचायतराज समिती २००८-०९ व २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल व २०१२-१३ च्या वार्षिक प्रशासन अहवालाची तपासणीे करणार आहे. या अनुषंगाने २०११-१२ या आर्थिक वर्षातील बांधकाम विभागाच्या लेखापरीक्षणाचा आढावा घेतला असता या विभागात अनियमिततेचा कहर झाल्याचे दिसून येत आहे. या विभागात तब्बल ७ कोटी ८५ लाख ८६ हजार ४४८ रुपयांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचे लेखापरिक्षणात नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील आलेगाव येथे आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या ६ लाख ७८ हजार ८७४ रुपयांच्या कामात अनियमितता झाली आहे. सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे ३ लाख ७९ हजार ५३० रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या कामातही अनियमितता झाली आहे. तसेच हिस्सी येथील ३ लाख ४२ हजार १८५ रुपयांच्या कामात, लाडनांदरा येथील ४ लाख १० हजार ३१३ रुपये खर्चून सामाजिक सभागृहाच्या कामात, जिंतूर तालुक्यातील कवडा येथे १ लाख ६३ हजार ६१३ रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या कामात अनियमितता झाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ५४ लाख ८० हजार ८२१ रुपये खर्च करुन करण्यात आलेल्या अंगणवाडी इमारत बांधकामात अनियमितता झाली आहे. रस्ते व पूल दुरुस्तीच्या १४ लाख ६८ हजार ६०० रुपयांच्या कामात तर एसआरएफमध्ये झालेल्या १ कोटी ८४ लाख लाख ३४ हजार ६३६ रुपयांच्या कामात अनियमितता झाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ८ लाख ३ हजार १३७ रुपये खर्च करुन करण्यात आलेल्या कामात तसेच शाळा दुरुस्तीच्या १४ लाख ३० हजार ८२५ रुपये खर्च करुन करण्यात आलेल्या कामात अनियमितता झाली आहे. १३ व्या वित्त आयोगातून मानवत येथे ६ लाख ९८ हजार २९७ रुपये, सेलू येथे १ लाख ९७ हजार ७६७, परभणी येथे ९ लाख ८ हजार ५५१ रुपये खर्च करुन करण्यात आलेल्या कामात अनियमितता झाली आहे. तसेच भोगाव- इटोली रस्त्याच्या १२ लाख ९५ हजार ८३५ रुपयांच्या कामात तर शेंद्रा- असोला रस्त्याच्या २४ लाख ८९ हजार ७२९ रुपयांच्या कामात अनियमितता झाली आहे. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे ८ लाख ६८ हजार ५०८ रुपये खर्च करुन बांधलेल्या भक्त निवासाच्या कामात तसेच ताडलिमला येथे ६ लाख ५० हजार ५७९ रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामात अनियमितता झाली आहे. गंगाखेड तालुक्यात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत १ लाख ३७ हजार ८४१ रुपये खर्च करुन तर शेंद्रा येथे ३ लाख ९५ हजार ८५ रुपये खर्च करून केलेल्या कामात अनियमितता झाली आहे.