श्रीमंत असल्याचे भासवून विवाह
By Admin | Published: February 21, 2017 10:18 PM2017-02-21T22:18:39+5:302017-02-21T22:22:48+5:30
बीड : दोन पेट्रोलपंप, ५० एकर शेती असल्याचे सांगून येथील एका तरुणीशी विवाह करुन ९ लाखास फसविल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा नोंद झाला
बीड : दोन पेट्रोलपंप, ५० एकर शेती असल्याचे सांगून येथील एका तरुणीशी विवाह करुन ९ लाखास फसविल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा नोंद झाला. ही घटना मंगळवारी लक्ष्मीनगरात उघडकीस आली.
स्वाती लक्ष्मण मगर पाटील (रा. नातेपोते ता. माळसिरस जि. सोलापूर हमु लक्ष्मीनगर, बीड) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये स्वातीचा विवाह लक्ष्मण राजाराम मगर पाटील याच्याशी झाला होता. विवाह जुळविताना सासरच्यांनी दोन पेट्रोलपंप, ५० एकर शेती असल्याची बतावणी केली. लग्नात हुंडा म्हणून साडेचार लाख, सव्वातीन लाखांचे दागिने व एक लाखाचे संसारोपयोगी साहित्यही घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर स्वाती माहेरी आली. तिच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात पती लक्ष्मण, सासू मंगल, दीर अरुण मगर पाटील व नणंद जनाबाई जाधव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. तपास सहायक निरीक्षक सलीम पठाण करत आहेत. (प्रतिनिधी)