‘घाणेवाडी’ साडेअकरा फुटांवर

By Admin | Published: June 16, 2014 12:15 AM2014-06-16T00:15:04+5:302014-06-16T01:19:01+5:30

जालना : शहरातील नवीन जालना भागात पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाची पाणीपातळी साडेअकरा फुटांवर आली आहे.

'Ghanewadi' on half an hour | ‘घाणेवाडी’ साडेअकरा फुटांवर

‘घाणेवाडी’ साडेअकरा फुटांवर

googlenewsNext

जालना : शहरातील नवीन जालना भागात पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाची पाणीपातळी साडेअकरा फुटांवर आली आहे. मात्र हा पाणीसाठा सद्यस्थितीत पुरेसा असल्याने पाणीपुरवठ्यावर त्याचा काहीही परिणाम झालेला नसल्याचे नगरपालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
या जलाशयाची पाणीपातळी क्षमता १७ फुटापर्यंत आहे. पूर्वी संपूर्ण शहराला या जलाशयाद्वारे पाणीपुरवठा होत होता. मात्र गतवर्षीपासून जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी उपलब्ध होऊ लागल्याने घाणेवाडी जलाशयाचा पाणीपुरवठा केवळ नवीन जालना भागास केला जातो. तर जायकवाडी योजनेद्वारे जुना जालना भागास पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने घाणेवाडी जलाशय ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर आता त्याची पातळी साडेअकरा फुटांवर आहे.
आता पावसाची प्रतीक्षा
ग्रामीण भागात खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. तर शहरात घाणेवाडी तसेच पाणीपुरवठा करणारे अन्य जलाशय यंदाच्या पावसाने भरावेत, यासाठी शहरातील नागरिकही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षी घाणेवाडी बरोबरच मोती तलाव व मुक्तेश्वर तलावातील गाळ काढल्यामुळे यावर्षी टंचाईची झळ बसली नाही.

Web Title: 'Ghanewadi' on half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.