वडगाव कोल्हाटीतील घरकुल योजनेला घरघर
By Admin | Published: July 25, 2016 12:48 AM2016-07-25T00:48:16+5:302016-07-25T01:06:01+5:30
औरंगाबाद : वाळूज महानगर परिसरात सिडको प्राधिकरणातर्फे ११४० घरकुलांची योजना निर्माण करण्याचा संकल्प २०१२ पासून करण्यात आला आहे. चार वर्षांपासून ही योजना मूर्त स्वरुपात आलेली नाही.
औरंगाबाद : वाळूज महानगर परिसरात सिडको प्राधिकरणातर्फे ११४० घरकुलांची योजना निर्माण करण्याचा संकल्प २०१२ पासून करण्यात आला आहे. चार वर्षांपासून ही योजना मूर्त स्वरुपात आलेली नाही.
पूर्व नियोजनानुसार ११४० घरकुल उभारण्याचा प्रस्ताव होता. परंतु ३० हजार अर्ज आल्यामुळे ३५०० घरकुल उभारण्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. अद्याप ही योजना पूर्ण झालेली नाही. जागा व तांत्रिक बाबींमुळे हा प्रकल्प रखडला आहे.
११४० घरे बांधली जाणार होती; परंतु नागरिकांचे अर्ज जास्त आल्यामुळे पूर्वनियोजित योजना रखडली. योजनेसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर जागा मिळावी, अशी सिडकोला अपेक्षा होती; परंतु सिडकोचा हा मनसुबा पूर्णत्वास गेला नाही.
वाळूज महानगर हा परिसर सिडको विकसित करीत असून, ८ टप्प्यांमध्ये तेथे टाऊनशिप उभारण्याच्या योजना आहेत. सध्या ४ योजना पूर्ण आहेत. शहरात सिडकोच्या स्वस्त घरकुल योजनांना जागेअभावी ब्रेक लागला आहे. तसाच प्रकार वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.