घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर; रुग्णांचे हाल
By संतोष हिरेमठ | Published: December 14, 2023 11:28 AM2023-12-14T11:28:51+5:302023-12-14T11:29:16+5:30
संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी नियोजन घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका संपावर गेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे.
घाटीत परिचारिकांनी मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शुभमंगल भक्त, इंदुमती थोरात, महेंद्र सावळे, द्रौपदी कर्डीले, हेमलता शुक्ला, प्रतिभा अंधारे , कालिंदी इंधाते, वंदना कोळंनूरकर, प्रवीण व्यवहारे, नवाज सय्यद, दत्ता सोनकांबळे, सुप्रिया मोहिते, प्रयाग राठोड, मीना मोरे, भावेश आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने परिचारिका, ब्रदर उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातही परिचारिका संपावर गेल्या आहेत.
दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी नियोजन घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. अधिकाधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.