घाटनांद्र्यात जि. प. शाळेतील मुलींनी गिरवले कराटेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:05 AM2020-12-30T04:05:41+5:302020-12-30T04:05:41+5:30
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका गुंफा आंदे ...
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका गुंफा आंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबाद येथून आलेल्या प्रशिक्षक कुमारी स्पर्शिका प्रवीणकुमार बुरड व सहकारी सेन्साई शेख आसिफ, सेन्साई सय्यद सोहेल या प्रशिक्षकांनी नववी ते दहावीच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात कोरोना महामारीमुळे मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी अशोक कुमावत, नारायण बिलंगे, इश्वर तांगडे, सुनील वानखेडे, भास्कर शिंदे आदींसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
चौकट
मुलींना शिकविल्या विविध टिप्स
घाटनांद्रा येथे कराटे प्रशिक्षण कार्यक्रमात कुडो प्रशिक्षक कुमारी स्पर्शिका व सहकारी सेन्साई शेख आसिफ, सेन्साई सय्यद सोहेल या प्रशिक्षकांनी मुलींना जर कोणी आपले केस मागून ओढले तर त्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे. तसेच आपण रस्त्याने एकटे चाललो व आपली कुणी छेड काढली तर त्यालासुद्धा कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे, अशा अनेक स्वसंरक्षणाच्या टिप्स शिकविल्या.
फोटो : घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देताना स्पर्शिका बुरड व इतर.