महाशिवरात्रीलाही घृष्णेश्वर मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:05 AM2021-03-13T04:05:12+5:302021-03-13T04:05:12+5:30
महाशिवरात्रीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी फक्त मंदिराच्या प्रांगणात नित्य पूजा आणि पालखी पूजा पुजारीच्या हस्तेच शासनाचे नियम पाळून करण्यात आली. पालखीसह ...
महाशिवरात्रीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी फक्त मंदिराच्या प्रांगणात नित्य पूजा आणि पालखी पूजा पुजारीच्या हस्तेच शासनाचे नियम पाळून करण्यात आली. पालखीसह मंदिराला सवाद्य तीन प्रदक्षिणा घालून पालखीचे पूजन झाले.
मागील वर्षी महाशिवरात्रीला हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती, पण सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा मंदिरासह पर्यटन स्थळे ४ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे गुरुवारपासून वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर परिसरातील गर्दी अचानक गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. घृष्णेश्वर मंदिरात फक्त काेरोनाचे नियम पाळून मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शशांक टोपरे यांनी सांगितले. मंदिर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-- कॅप्शन :