प्युट्रो रिकोतील महाकाय
By | Published: December 3, 2020 04:08 AM2020-12-03T04:08:19+5:302020-12-03T04:08:19+5:30
५७ वर्षांतील अनेक खगोलीय शोधांची साक्षीदार सॅनवॉन (प्युट्रो रिको) : अनेक खगोलीय संशोधनात महत्त्वाचे योगदान देणारी प्युट्रो रिकोमधील ...
५७ वर्षांतील अनेक खगोलीय शोधांची साक्षीदार
सॅनवॉन (प्युट्रो रिको) : अनेक खगोलीय संशोधनात महत्त्वाचे योगदान देणारी प्युट्रो रिकोमधील महाकाय दुर्बीण कोसळली. पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली असलेल्या ही रेडिओ दुर्बीण अनेक खगोलीय शोध लावण्यात मोलाची मदत करीत गेली ५७ वर्षे चक्रीवादळ, भूकंपाचा मुकाबला करीत आजवर तग धरून होती.
या दुर्बीणला भक्कम आधार देणारी सहायक रज्जू (केबल) तुटल्याने परावर्ती आकाशगवर ( रिफ्लेक्टर डिश) १०० फुटांचा तडा गेला होता. त्यामुळे ऑगस्टपासून अर्सिबो वेधशाळा ऑगस्टपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुख्य रज्जू तुटली. नुकसान मोठे असल्याने नॅशनल सायन्स फाऊंडेशनने ही रेडिओ दुर्बीण बंद करण्याची घोषणा केली होती.
अनेक खगोलीय शोधांची साथीदार असलेली ही महाकाय रेडिओ दुर्बीण कोसळल्याच्या वृत्ताने अनेक खगोलशास्त्र व्यथित झाले. ही जगातील दुसरी सर्वात मोठी दुर्बीण होती. एक हजार फूट व्यास आणि ८९६ फूट त्रिज्या असलेली ही वर्तुळाकार दुर्बीण होती.