आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:01 AM2017-11-15T00:01:56+5:302017-11-15T00:02:01+5:30

महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Gifts for suicidal families | आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. आतापर्यंत १६९ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. २0१२ पासून आजपर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्येची नोंद १६९ एवढी आहे. यापैकी १३४ शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रस्ताव शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर २९ शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळू शकली नाही. यामध्ये २0१२ मध्ये ३, २0१३ मध्ये २, २0१४ मध्ये ३१, २0१५ मध्ये ४१, २0१६ मध्ये ४९ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. तर २0१७ मध्ये आॅक्टोबरमध्येच शेतकरी आत्महत्यांचा आकडा ४३ वर पोहोचलेला आहे. त्यामुळे शेतकºयांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे चित्र आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने नापिकी, इतर कारणांमुळे शेतकºयांना कर्जफेडही शक्य होत नाही. शिवाय लग्नकार्य, मुलांचे शिक्षण व इतर कामांसाठी हाती दमडीही उरत नाही. मागील चार ते पाच वर्षांत निसर्गासमोर शेतकरी हतबल झालेला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी आवर्षणाच्या फेºयात अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकºयांना या चक्रातून बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना तोकड्या शासन मदतीवर दिलासाही मिळत नाही.

Web Title: Gifts for suicidal families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.