जिन रिफ्लेक्सोलॉजी दिनानिमित्त उपक्रम: ४ राज्यात राबविणार ‘स्वस्थ भारत अभियान’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:46 AM2024-05-31T11:46:29+5:302024-05-31T11:49:08+5:30
१ जूनला दोंडाईचामध्ये अभियानाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: ‘आजारावर उपचार करण्यापेक्षा अधिक चांगले आहे की, आपण आजारीच पडू नाही’, या उद्देशाने इंटरनॅशनल रिफ्लेक्सोलॉजी जिन असोसिएशनतर्फे ‘जिन रिफ्लेक्सोलॉजी दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १ ते २१ जूनदरम्यान देशातील ४ राज्यात ‘स्वस्थ भारत अभियान’ राबविण्यात येणार आहे.
‘जिन रिफ्लेक्सोलॉजी दिन ते आंतरराष्ट्रीय योग दिवस’ दरम्यान हे अभियान घेण्यात येणार आहे. २१ दिवसांत ४ राज्यांतील २० शहरांत २१ सेमिनारचे नियोजन करण्यात आले आहे. ‘भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांना जिन रिफ्लेक्सोलॉजीद्वारे कसे टाळायचे, याची सविस्तर माहिती या अभियानात देण्यात येणार आहे. या अभियानाचा मीडिया पार्टनर ‘लोकमत’ आहे. हे अभियान यशस्वितेसाठी आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी जिन असोसिएशनसोबत विविध संस्था, संघटना परिश्रम घेत आहेत. सर्व सेमिनारसाठी मुख्य वक्ते जिन रिफ्लेक्सोलॉजीचे संशोधनकर्ता जि. रि. अनिल जैन उपस्थित राहणार आहेत.
अभियानाच्या नियोजनासाठी १० सदस्यांच्या समितीमध्ये मार्गदर्शक लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा हे आहेत. तसेच समितीत जि. रि. शिल्पा जैन, जि. रि. सपना पाटणी, जि. रि. अनुप्रिता गांधी, जि. रि. सपना गांधी, जि. रि. मोनिका काठेड, जि. रि. मयुरी सुराणा, जि. रि. अनिता सुराणा, डॉ. निर्मला पारधी यांचा समावेश आहे. अभियानातील सेमिनार नि:शुल्क असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच जे काही कारणास्तव सहभागी होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी यू-ट्यूबच्या जिन रिफ्लेक्सोलॉजी चॅनेलवर सेमिनार उपलब्ध असणार आहे.
१ जूनला दोंडाईचामध्ये अभियानाला सुरुवात
जिन रिफ्लेक्सोलॉजी दिवसानिमित्त ‘स्वस्थ भारत अभियाना’चा शुभारंभ १ जूनला दोंडाईचा (खान्देश) येथे होणार आहे. चॅरिटेबल ट्रस्टद्वारा सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. २१ जूनला छत्रपती संभाजीनगरात अभियानाची सांगता स्वस्थ भारत अभियानाची सांगता दि. २१ जून रोजी शहरात होणार आहे. तसेच नि:शुल्क प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.