अद्रकीच्या उत्पादनात वाढ, भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:05 AM2021-06-06T04:05:06+5:302021-06-06T04:05:06+5:30

बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या अद्रक पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, अद्रकीच्या भावात ...

Ginger production increases, prices fall | अद्रकीच्या उत्पादनात वाढ, भावात घसरण

अद्रकीच्या उत्पादनात वाढ, भावात घसरण

googlenewsNext

बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या अद्रक पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, अद्रकीच्या भावात गेल्या दोन वर्षांपासून घसरण झाल्याने त्यांनी लावलेला खर्च देखील निघेना. एकीकडे अशी विदारक स्थिती असताना देखील शेतकरी यंदा मोठ्या आशेने पुन्हा अद्रकीच्या लागवडीकडे वळला आहे. यंदा तरी अद्रकीला चांगला भाव मि‌ळेल, या आशेने शेतकरी लागवड करू लागला आहे.

तीन वर्षांपूर्वी उत्पादनात हमखास नफा देऊन जाणारे पीक म्हणून अद्रकीची ओळख झाली होती. परंतु गेल्या तीन वर्षांपासून अद्रकीच्या भावात सातत्याने घसरण होत गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. २०१९ मध्ये अद्रकीचा भाव सात ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल झाला होता. त्यामुळे अद्रक पीक शेतकऱ्यांना भरपूर नफा देऊन गेले होते. गेल्या दोन वर्षांपासून उत्पादन जेमतेम असताना भावातील घसरणीने खर्चही निघालेला नाही. २०२० मध्ये प्रति क्विंटल तीन ते चार हजार रुपये उत्पादन मिळाले, तर यंदा अद्रकीला सातशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागल्याने शेतकरी अडचणीत आला.

कोट

एक एकर पिकासाठी नांगरणी, वखरणी, बेड तयार करणे, शेणखत, ठिबक व बेणे तसेच औषधी व काढणी असा एकूण नव्वद हजारांच्या पुढे खर्च लागतो. अद्रकीचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होते. परंतु, भावात घसरण झाल्याने लावलेला खर्च देखील निघाला नाही.

संजय खंडागळे, येसगाव, शेतकरी.

---

अद्रक पिकामध्ये सध्या भावातील घसरणीमुळे तोटा होत आहे. किमान आगामी काळात भाववाढ होऊन हाती चार पैसे राहतील, अशी आशा असल्याने मी पुन्हा दोन एकरावर अद्रक लागवड करीत आहे.

युवराज कदम, शेतकरी

---

फोटो : बाजारसावंगी परीसरातील शेतकरी अद्रक लागवड करताना.

040621\screenshot_20210603-143021_whatsapp_1.jpg

अद्रक लागवड करताना महिलावर्ग

Web Title: Ginger production increases, prices fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.