गिरीश गाडेकरचे तडाखेबंद शतक, एमजीएम इलेव्हन उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:08 AM2019-01-13T01:08:58+5:302019-01-13T01:09:51+5:30
एमजीएमच्या मैदानावर सुरूअसलेल्या डॉक्टरांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत डॉ. गिरीश गाडेकर यांनी चौफेर टोलेबाजी करताना स्फोटक शतकी खेळी केली. त्यांच्या शतकी खेळीच्या बळावर एमजीएम इलेव्हन संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.
औरंगाबाद : एमजीएमच्या मैदानावर सुरूअसलेल्या डॉक्टरांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत डॉ. गिरीश गाडेकर यांनी चौफेर टोलेबाजी करताना स्फोटक शतकी खेळी केली. त्यांच्या शतकी खेळीच्या बळावर एमजीएम इलेव्हन संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.
गिरीश गाडेकर यांनी ५१ चेंडूंतच ९ सणसणीत चौकार आणि ८ टोलेजंग षटकारांसह फटकावलेल्या नाबाद १00 धावांच्या बळावर एमजीएम इलेव्हन संघाने २0 षटकांत २ बाद १८६ धावांचा डोंगर रचला. गिरीश गाडेकर यांना डॉ. रवी महाजन यांनी ३७ व व डॉ. अल्फाने ३0 धावा काढून साथ दिली. प्रत्युत्तरात बीएमए मुंबई संघ २0 षटकांत ५ बाद १४४ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून इशान ठक्करने ६२ धावा केल्या. एमजीएम इलेव्हन संघाकडून डॉ. प्रशांत मिश्रा यांनी १४ धावांत ३ तर सम्राट गुट्टे व बनकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. एमजीएमचा संघ आता उपांत्य फेरीत गतविजेत्या पुणे येथील पद्मालय संघाविरुद्ध तर ठाणे सुपर ब संघ पुणे वॉरियर्सविरुद्ध दुसऱ्या सेमीफायनलमध्ये खेळेल.
संक्षिप्त धावफलक
एमजीएम इलेव्हन : २0 षटकांत २ बाद १८६. (गिरीश गाडेकर नाबाद १00, रवी महाजन ३७, अल्ताफ २0.)
बीएमए मुंबई : २0 षटकांत ५ बाद १४४. (इशान ठक्कर ६२. प्रशांत मिश्रा ३/१४, सम्राट गुट्टे १/४२).