'लिव्ह इन' मध्ये राहणा-या प्रेयसीची प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 05:30 PM2017-07-31T17:30:03+5:302017-07-31T17:32:56+5:30
'लिव्ह इन' मध्ये राहत असताना प्रियकराने लग्नाचे अमिष दाखवून प्रेयसीसोबत शारिरीक संबंध ठेवल्यानंतर ती गर्भवती राहिली. परंतु, प्रियकराने वयाचे कारण देत लग्नाला नकार दिल्याने संतप्त प्रेयसीने त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ३१ : सहा महिन्यापासून जाधववाडी येथील प्रेमी युगुल 'लिव्ह इन रिलेशन' राहत होते. यातील प्रियकर प्रेयसिपेक्षा वयाने लहान आहे. 'लिव्ह इन' मध्ये राहत असताना प्रियकराने लग्नाचे अमिष दाखवून प्रेयसीसोबत शारिरीक संबंध ठेवल्यानंतर ती गर्भवती राहिली. परंतु, प्रियकराने वयाचे कारण देत लग्नाला नकार दिल्याने संतप्त प्रेयसीने त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच त्याला वेळोवेळी मदत करणा-या त्याच्या वडिलाविरूद्धहि तिने सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
स्वप्नील किसन गवळे आणि किसन पुंजाजी गवळे (रा. जाधववाडी, नवा मोंढा परिसर)अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडको परिसरात राहणारी तक्रारदार तरूणीचे वय २१ वर्ष तर आरोपी स्वप्नील हा २० वर्षाचा आहे. दोन वर्षापूर्वी पीडिता आणि आरोपीची स्वप्नीलची भेट झाली. सुरवातील त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सहा महिन्यापूर्वी दोघेही घरातून पळून गेले होते. याप्रकरणी स्वप्नीलविरूद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. तेव्हा पोलिसांनी या प्रेमी युगूलास पकडून उच्च न्यायालयासमोर हजर केले असता तिने आईवडिलांकडे जाण्यास नकार दिला होता.तेव्हापासून ती स्वप्नीलसोबत राहात होती.
दरम्यान, स्वप्नीलने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. परिणामी पीडिता आज पाच महिन्याची गर्भवती आहे. लग्नासाठी मुलाचे वय २१ वर्ष असणे बंधनकारक आहे. वय कमी पडत असल्याने स्वप्नीलने तिला लग्नास नकार दिला. आरोपी लग्न करीत नसल्याने पीडितने सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. शिवाय, स्वप्नीलच्या वडिलांनेही त्यास वेळोवेळी पैसे पुरवून पीडितेसोबत राहण्यास प्रोत्साहित केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कोते हे करीत आहेत.