भरधाव टँकरच्या धडकेत मुलगी ठार; दामत्यासह दोन मुले बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 06:20 PM2021-06-03T18:20:15+5:302021-06-03T18:20:46+5:30

या अपघातानंतर टँकर चालक मारहाणीच्या भितीने टँकरसह सुसाट वेगाने ए.एस.क्लबच्या दिशेने पसार झाला.

Girl killed in speedy tanker collision; Two children were rescued along with married couple | भरधाव टँकरच्या धडकेत मुलगी ठार; दामत्यासह दोन मुले बचावली

भरधाव टँकरच्या धडकेत मुलगी ठार; दामत्यासह दोन मुले बचावली

googlenewsNext

वाळूज महानगर : टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरुन खाली पडलेली एक आठ वर्षीय मुलगी टँकरच्या चाकाखाली सापडून ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.३) सकाळी ११ वाजेच्या सुमारास तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ घडली. नम्रता दिलीप सिरसाठ (८ रा.तीसगाव परिसर), असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे आई-वडील, भाऊ व मामाची मुलगी असे चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, दिलीप मोहन शिरसाट (३५ रा. तीसगाव परिसर) हे गुरुवारी (दि.३) जोगेश्वरी येथून पत्नी जयश्री (३०) मुलगा सिद्धार्थ (१२), मुलगी नम्रता (८) व सिरसाठ यांच्या मेव्हण्याची मुलगी डॉली ऊर्फ स्रेहल रामदास भोसले (६) असे पाच जण दुचाकीने (एम.एच.२०, बी.डी.६४६७) तीसगावला घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, मनमाडहून इंधन भरुन तिर्थपुरीकडे (ता.आंबड) जाणाऱ्या भरधाव टँकरने (एम.एच.२२, ए.ह.३३४४) त्यांच्या दुचाकीला खवड्या डोंगराजवळ धडक दिली. या अपघातात टँकरच्या चाकाखाली सापडून नम्रता घटनास्थळीच ठार झाली. तर उर्वरित चौघेजण जखमी झाले. 

या अपघातानंतर टँकर चालक मारहाणीच्या भितीने टँकरसह सुसाट वेगाने ए.एस.क्लबच्या दिशेने पसार झाला. हा अपघात पाहताच नितीन पनबिसरे, सुनील जोगंदड, सचिन पाले व रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी अपघातस्थळ गाठुन जखमींना मदत केली. यानंतर या मार्गावरुन जाणाऱ्या एका खाजगी कारमध्ये मयत नम्रता तसेच जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांनी पसार झालेल्या टँकर चालकालाही पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहा.निरीक्षक मंगलसिंग घुनावत, पोहेकॉ.तुकाराम पवार, पोकॉ. राहुल लोखंडे, राजेश मैत्रकर आदींनी अपघातस्थळाची पाहणी केली.

Web Title: Girl killed in speedy tanker collision; Two children were rescued along with married couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.