पहिले लग्न झालेले असताना दुसऱ्यासोबत घरोबा करणाऱ्या वधूसह नातेवाईकांवर गुन्हा
By बापू सोळुंके | Updated: June 30, 2024 14:40 IST2024-06-30T14:40:18+5:302024-06-30T14:40:26+5:30
छत्रपती संभाजीगनर: आधी केलेले कोर्ट मॅरेज लपवून दुसऱ्या तरूणासोबत लग्न करणाऱ्या नवरीसह तिच्या नातेवाईकांविरोधात तरूणाने सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा ...

पहिले लग्न झालेले असताना दुसऱ्यासोबत घरोबा करणाऱ्या वधूसह नातेवाईकांवर गुन्हा
छत्रपती संभाजीगनर: आधी केलेले कोर्ट मॅरेज लपवून दुसऱ्या तरूणासोबत लग्न करणाऱ्या नवरीसह तिच्या नातेवाईकांविरोधात तरूणाने सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलीस हवालदार तेलुरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. बाबासाहेब मुळे, मोहनभाई देवराव मुळे, मालन मोहनभाई मुळे, महेंद्र सोनवणे यांचा मेव्हणा आणि वधूसह तीन महिलांचा आरोपीमध्ये समावेश आहे.
या घटनेविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पुण्यवर्धन चंद्रभान साळवे (३२,रा. पवननगर)यांचा विवाह शहरातील एका मुलीसोबत गतवर्षी सन २०२३ मध्ये झाला होता. विवाहानंतर पाच ते सहा महिन्यानंतर वधूच्या पहिल्या लग्नासंदर्भात साळवे यांना समजले. त्यांनी याविषयी पीडितेला विचारणा केली असता तिचे पहिले कोर्ट मॅरेज झाल्याची कबुली दिली. पहिल्या पतीसोबत तुम्हाला सोडून कधीही जाऊ शकते, असे तिने साळवे यांना सांगितले.
यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. जिच्यासोबत आयुष्यभर सोबत राहण्याचे स्वप्न पाहिले त्या तरूणीने पहिले लग्न लपवून आपल्यासोबत दुसरे लग्न केले. एवढेच नव्हे तर तिच्या नातेवाईकांनी ही बाब लपवून ठेवल्याचे समजल्याने साळवे यांनी २९ जून रोजी दुपारी सिडको पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार नाेंदवली.