‘दंत’च्या विद्यार्थिनीसाठी सरसावले मैत्रिणी, प्राध्यापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:05 PM2019-04-14T22:05:20+5:302019-04-14T22:05:34+5:30
शहरातील शासकीय दंत महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी रिझवाना शेख अंजूम ही गंभीर आजाराने ग्रस्त असून, तिच्यावर घाटी ‘एमआयसीयू’मध्ये उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद : शहरातील शासकीय दंत महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी रिझवाना शेख अंजूम ही गंभीर आजाराने ग्रस्त असून, तिच्यावर घाटी ‘एमआयसीयू’मध्ये उपचार सुरू आहेत. तिच्या उपचारासाठी मैत्रिणींनी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक-अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ५० हजार रुपये जमा केले.
रिझवाना ही अतिशय गरीब कुटुंबातील आहे. सद्यस्थितीत ती शहरातील शासकीय दंत महाविद्यालयातील दुसºया वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. तिला त्रास सुरू झाला आणि तपासणीनंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) ‘एमआयसीयू’मध्ये मागच्या आठवड्यात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार करणारे घाटीच्या औषधवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांनी सांगितले, रिझवाना हिला गाठीचा क्षयरोग (लिम्फनोड टीबी) असल्याचे निदान झाले आहे. शरीरात जंतुसंसर्ग पसरला आहे. तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. तिच्यावर उपचारासाठी घाटीतील डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
महागडा औषधोपचार, विविध चाचण्यांसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी तिच्या उपचारासाठी मैत्रिणींनी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक-अधिकारी-कर्मचाºयांनी ७० हजार रुपये जमा केले. तिच्या उपचासाठी आणखी मदतीची गरज आहे, त्यासाठी रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.