अपंग भावासोबत मैत्रिणीचे लग्न लावून केला बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 11:53 PM2017-02-27T23:53:46+5:302017-02-27T23:53:46+5:30
मैत्रिणीला नोकरीचे आमिष दाखवून तिला पळवून नेऊन स्वत:च्या अपंग भावासोबत तिचे लग्न लावल्यानंतर तिच्यावर बलात्कार करणा-या तरुणाला हर्सूल पोलिसांनी
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 27 - मैत्रिणीला नोकरीचे आमिष दाखवून तिला पळवून नेऊन स्वत:च्या अपंग भावासोबत तिचे लग्न लावल्यानंतर तिच्यावर बलात्कार करणा-या तरुणाला हर्सूल पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात बलात्कार, अपहरण, कट रचणे आणि तरुणीला डांबून ठेवल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
जगदीश पंढरीनाथ होंडे (२४, रा. पिंपळळगाव, वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची आई, भाची सोनी मोरे, भाचा मंगेश कोलते आणि भाऊ गणेश खोंडे अशी अन्य आरोपींची नावे असून, त्यांचा शोध सुरू आहे. हर्सूल ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांनी या घटनेविषयी सांगितले की, पीडिता ही म्हसोबानगर येथील रहिवासी आहे. आरोपी एम.ए.चे तर पीडिता बी.ए.मध्ये शहरातील एका महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत असल्याने त्यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आरोपीने २० फेब्रुवारी रोजी पीडितेला एका शाळेवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शैक्षणिक कागदपत्रांसह बोलावून घेतले. त्यानंतर भानुदासनगर येथे राहणा-या मीरा बबन कोलते नावाच्या बहिणीच्या घरी तिला चार दिवस डांबून ठेवले. आरोपीचा मोठा भाऊ शंकर हा अपंग असून तो गावाकडे किराणा दुकान चालवितो. शंकरची पत्नी मृत झालेली आहे. आरोपीची आई, भाची सोनी मोरे, भाचा मंगेश कोलते आणि भाऊ गणेश खोंडे यांच्याशी संगनमत करून त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी जालना येथे आर्य समाज पद्धतीने शंकरसोबत पीडितेचे लग्न लावले. लग्नानंतर पीडिता रडायला लागल्याने तिची समजूत काढून आणतो, असे सांगून जगदीश हा पीडितेला तेथून घेऊन गंगापूर येथे राहणाºया नातेवाईकांच्या शेतवस्तीवर गेला. २४ रोजी रात्री मुक्काम केल्यानंतर दुसºया दिवशी दुपारी वस्तीवरील घरी कोणी नसल्याची संधी साधून जगदीशने पीडितेवर बलात्कार केला. यानंतर तो तिला घेऊन रात्री औरंगाबादेत आला. २५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) परिसरातील एका लॉजमध्ये तिला घेऊन मुक्कामी थांबला.
लॉजमधील रजिस्टरवर पती-पत्नीची नोंद
लॉजमध्ये थांबण्यापूर्वी तेथील रजिस्टरमध्ये आरोपीने त्याची आणि पीडितेचे पती-पत्नी असे नाते असल्याचे नमूद केले. लॉजवर मुक्कामी असताना मध्यरात्रीनंतर त्याने पुन्हा पीडितेवर अत्याचार केला. दुसºया दिवशी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी आरोपी झोपलेला असल्याची संधी साधून पीडितेने लॉजमधून धूम ठोकली आणि घर गाठले. त्यानंतर आज सकाळी हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविली.
आरोपीला ठोकल्या बेड्या
तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक वसीम हाश्मी, पोलीस उपनिरीक्षक दादाराव बनकर, सहायक उपनिरीक्षक विठ्ठल जवखेडे, उत्तम गिरी आणि कर्मचारी शेख महेबूब यांनी मोठ्या शिताफीने आरोपी जगदीशचा शोध घेऊन त्यास बेड्या ठोकल्या.