मैत्रिणीवर बलात्कार; पोलीस कर्मचारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:03 AM2018-06-19T01:03:34+5:302018-06-19T01:03:47+5:30

सहा महिने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये एकाच छताखाली राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकर पोलिसाला सिटीचौक पोलिसांनी सोमवारी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली.

Girlfriends rape; Police employee arrested | मैत्रिणीवर बलात्कार; पोलीस कर्मचारी अटकेत

मैत्रिणीवर बलात्कार; पोलीस कर्मचारी अटकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सहा महिने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये एकाच छताखाली राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकर पोलिसाला सिटीचौक पोलिसांनी सोमवारी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली. आरोपी पोलिसाविरोधात त्याच्या प्रेयसीने एप्रिल महिन्यात सिटीचौक ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदविली होती. या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने त्याला जामीन नाकारल्याने तो सोमवारी पोलिसांसमोर हजर झाला.
अमोल शिवाजी सोनटक्के (२८, रा. भोईवाडा) असे अटकेतील पोलिसाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे यांनी सांगितले की, तक्रारदार तरुणी ही शहरातील एका महाविद्यालयात विधि शाखेचे शिक्षण घेत आहे. गतवर्षी अमोलसोबत तिची ओळख झाली. यावेळी त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला सतत फोन करून, मेसेज पाठवून त्याने तिच्याशी जवळीक वाढविली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशिवाय राहूच शकत नसल्याचे तो तिला भासवत असे. आपल्यावर प्रेम करणारा तरुण पोलीस कर्मचारी असून, तो कायद्याचा रक्षक असल्याने त्याच्याकडून धोका होणार नाही, असे तिचे ठाम मत होते. एवढेच नव्हे तर गतवर्षी जून महिन्यात आरोपीने तिच्या कपाळाला कुंकू लावले आणि बेंटेक्सचे मंगळसूत्रही तिच्या गळ्यात घातले आणि तो तिच्यासह खोली भाड्याने घेऊन राहू लागला. ३० जून २०१७ ते २१ जानेवारीदरम्यान त्याने लग्नाच्या आमिषाने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. दरम्यान तिने लग्नासाठी तगादा लावण्याने तो टाळाटाळ क रू लागला. नंतर त्याने लग्नाला नकार देत तिला सोडून तो दुसरीकडे राहण्यास गेला.

Web Title: Girlfriends rape; Police employee arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस