मुलींचा कल शिक्षणाकडे

By Admin | Published: July 10, 2014 11:44 PM2014-07-10T23:44:45+5:302014-07-11T00:59:42+5:30

शेवगा : अंबड तालुक्यातील शेवगा, धनगर पिंपरी, लालवाडी हारतखेडा, मसई या भागातून शिक्षण घेण्यासाठी अनेक मुली शहरासह इतर ठिकाणी शिक्षणासाठी जात असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

Girls' education | मुलींचा कल शिक्षणाकडे

मुलींचा कल शिक्षणाकडे

googlenewsNext

शेवगा : अंबड तालुक्यातील शेवगा, धनगर पिंपरी, लालवाडी हारतखेडा, मसई या भागातून शिक्षण घेण्यासाठी अनेक मुली शहरासह इतर ठिकाणी शिक्षणासाठी जात असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
शेवगा परिसरात जनजागृती विद्यालयात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. मत्स्योदरी विद्यालय अंबड व मठपिंपळगाव येथील विद्यालय, नेहरू विद्यालय पांगरी येथे देखील मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढल्याने पालक आपल्या मुला-मुलींमध्ये भेद करत नसल्याचे समाधानकारक चित्र सध्या तालुक्यात आहे. राज्य शासनाच्या विविध योजना गावापर्यंत पोहोचल्याने शिक्षणाचे महत्व सर्वांना पटत आहे.
मुलींच्या शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने अनेक उपक्रम आणि जनजागृतीचे काम केल्याने आणि मुलींसाठी इयत्ता ५ ते १२ पर्यंत बस पासेसची मोफत व्यवस्था, आणि सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके, पोषण आहार योजना, मोफत कपडे या सर्व बाबी शासनाने उपलब्ध करून दिल्याने खास ग्रामीण भागातील मुलींचा शिक्षण घेण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
सर्वशिक्षा अभियानाचा फायदा
शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने अनेक उपक्रम आणि जनजागृतीचे काम केल्याने आणि मुलींसाठी इयत्ता ५ ते १२ पर्यंत बस पासेसची मोफत व्यवस्था, तसेच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके , पोषण आहार योजना,माफत कपडे या सुविधांमुळे ग्रामीण मुलींना शिक्षणाची गोडी लागत आहे.

Web Title: Girls' education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.