बदनामी केल्याने मुलीची आत्महत्या
By Admin | Published: August 11, 2014 12:02 AM2014-08-11T00:02:44+5:302014-08-11T00:04:28+5:30
जालना : परतूर तालुक्यातील पांडेपोखरी येथील अल्पवयीन मुलीची प्रसृती झाल्याची खोटी माहिती देऊन शासकीय सेवेचे वैद्यकीय वाहन घरी पाठविले. आपली बदनामी झाल्याचा मन:ताप होऊन बालिकेने आत्महत्या केली.
जालना : परतूर तालुक्यातील पांडेपोखरी येथील अल्पवयीन मुलीची प्रसृती झाल्याची खोटी माहिती देऊन शासकीय सेवेचे वैद्यकीय वाहन घरी पाठविले. आपली बदनामी झाल्याचा मन:ताप होऊन १६ वर्षीय बालिकेने विषारी द्र्रव्यसेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी ९ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
दत्ता कुंडलिक जगताप या युवकाने गावातील एका व्यक्तीच्या मुलीला प्रसृती वेदना असल्याची खोटी माहिती वैद्यकीय पथकाला दिली. शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या अॅम्ब्युलंस सेवेचे वाहन घरी दाखल झाले. त्यावेळी ही माहिती खोटी असल्याचे लक्षात आल्यानंतर पथक निघून गेले. मात्र या प्रकाराने सदर कुटूंबाला मोठा मानसिक धक्का बसला. समाजात आपली अप्रिष्ठा झाल्याच्या भावनेतून या १६ वर्षीय बालिकेने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास सदर आरोपीने प्रवृत्त केल्याने आष्टी ठाण्यात भादवि कलम ३०६ व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातात जखमी
अंबड-मंठा बायपासवरील रेवगाव पाटीजवळ शारदा गाडे व राजू गाडे या मोटारसायकलवरून जाणाऱ्या पती-पत्नीला समोरून आलेल्या दुसऱ्या मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिली.
यात ते जखमी झाले. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार राजपूत करीत आहेत. (प्रतिनिधी)