नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना १५ गुणांचा ग्रेस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:04 AM2021-07-23T04:04:27+5:302021-07-23T04:04:27+5:30
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा शासनाने निर्णय घेतला. ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा शासनाने निर्णय घेतला. गेल्या वर्षी अंतिम वर्षाव्यतिरिक्त अन्य वर्गांच्या ऑफलाइन परीक्षा घेऊ नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले असतानाही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या ऑफलाइन परीक्षा घेतल्या. मात्र, निकालामध्ये विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले नाहीत. यामुळे २०२० सत्र परीक्षेत अनेक विद्यार्थी नापास झाले. महाविद्यालयांनी घेतलेल्या ऑनलाइन तासिकांद्वारे ३० ते ३५ टक्केही अभ्यासक्रम शिकविण्यात आलेला नाही. दुसरीकडे, विद्यापीठाने नर्सिंगच्या भाग-१ व भाग-२ या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना १५ गुणांचा ग्रेस देऊन निकाल जाहीर करावा, अशी मागणी मावळा संघटनेने केली आहे. या मागणीचा विचार न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.