' ५० हजार द्या, नाहीतर तुमचे दुकान जाळील', व्यापाऱ्याला धमकी देणारा जेरबंद; सिल्लोडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:37 PM2022-04-17T12:37:33+5:302022-04-17T12:37:43+5:30
५० हजारांची खंडणी घेतांना आरोपीला सिल्लोड पोलिसांनी रंगेहात पकडले.
सिल्लोड: शहरातील एका जनरल स्टोर होलसेल दुकानदाराला ५० द्या अन्यथा तुमचे दुकान जाळून टाकील, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी मध्यरात्री जवळपास ११:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी खंडनीखोर आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
अरबाज शेख जफर(वय २० वर्षे रा. डॉ. हुसेन कॉलनी सिल्लोड) आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अरबाजने सिल्लोड शहरातील व्यापारी मुकेश चंद्रभान तलरेजा(वय ५२ वर्षे रा.शास्त्री नगर)यांना त्यांच्या भाऊ गोविंद तलरेजा यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सएप कॉल करून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडनी दिली नाही तर तुमचे आर एल पार्क मध्ये असलेले दुकान जाळून टाकील अशी धमकी दिली.
याबाबत मुकेश चंद्रभान तलरेजा यांनी सिल्लोड पोलिसांना तोंडी माहिती दिली. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे , भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांच्या मदतीने सापळा रचला. पंचासह आरोपीने सांगितलेल्या ठिकाणीं ५० हजार रुपयांचे पैशाचे पॉकेट भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया घेऊन गेले होते. आरोपीने येऊन ते पॉकेट घेतले, त्याने पॉकेट घेताच पोलीस पथकाने पकडले. त्याचेकडून मोबाईल फोन व मुद्देमाल हस्तगत केला. सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला जेरबंद करण्यात आले आहे.