मोफत शिक्षण, धान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:04 AM2021-05-20T04:04:36+5:302021-05-20T04:04:36+5:30

औरंगाबाद : १५ वर्षांच्या आतील मुलांना मोफत शिक्षण आणि सामान्य नागरिकांना मोफत धान्य देण्याची मागणी भारतीय दलित पँथरने ...

Give free education, grain | मोफत शिक्षण, धान्य द्या

मोफत शिक्षण, धान्य द्या

googlenewsNext

औरंगाबाद : १५ वर्षांच्या आतील मुलांना मोफत शिक्षण आणि सामान्य नागरिकांना मोफत धान्य देण्याची मागणी भारतीय दलित पँथरने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर लक्ष्मण भुतकर, प्रकाश पवार, दशरथ कांबळे, संजय सरोदे, नजीम काझी, गीताबाई म्हसके, अमोल भूतकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मद्यविक्रीच्या होम डिलिव्हरीला परवानगी

औरंगाबाद : जिल्ह्यातील किरकोळ मद्य विक्रीच्या घरपोच सेवेला बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांनी परवानगी दिली. मद्याची सीलबंद बाटलीतून घरपोच विक्रीची सेवा देताना कोरोना विषाणूबाबत जिल्हा प्रशासनाने विहीत केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश कदम यांनी दिले आहेत.

जयभवानीनगरचा रस्ता चिखलात

औरंगाबाद : जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनच्या रस्त्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. परंतु, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर प्रचंड चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ होत आहे.

पुंडलिकनगरमध्ये वीजपुरवठा खंडित

औरंगाबाद : पुंडलिकनगर परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसांपासून दिवसभरात चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित होतो आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून वीज गेली होती.

Web Title: Give free education, grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.