जागा द्या, ड्रायपोर्टसाठी प्रयत्न करु

By Admin | Published: August 28, 2014 01:35 AM2014-08-28T01:35:32+5:302014-08-28T01:39:57+5:30

उस्मानाबाद : जिल्ह््याचा अजूनही हव्या तेवढ्या प्रमाणात विकास झालेला नाही. तसेच केंद्र शासनाच्या मागास जिल्ह््याच्या यादीतही समावेश नाही.

Give space, try for the drafts | जागा द्या, ड्रायपोर्टसाठी प्रयत्न करु

जागा द्या, ड्रायपोर्टसाठी प्रयत्न करु

googlenewsNext


उस्मानाबाद : जिल्ह््याचा अजूनही हव्या तेवढ्या प्रमाणात विकास झालेला नाही. तसेच केंद्र शासनाच्या मागास जिल्ह््याच्या यादीतही समावेश नाही. ज्या भागात उद्योग भरभराटीस येतात त्या भागाचा विकास झपाट्याने होतो. जिल्ह््यातील पीक व टंचाई परिस्थितीची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांनी जिल्ह््यात उद्योग आणा, अशी मागणी केली आहे. मागणी रास्त आहे. जिल्ह््यामध्ये ड्रायपोर्ट उभारण्यासाठी पोषक वातावरण आहे. जागा उपलब्ध करुन दिल्यास ड्रायपोर्ट उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी दिली.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी बुधवारी जिल्हाभरात विविध गावांना भेटी देवून पीक व टंचाई परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये टंचाईबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत खा. प्रा. रवींद्र गायकवाड, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, सुधीर पाटील आदींची उपस्थिती होती. उस्मानाबादचा केंद्र शासनाच्या मागास जिल्ह्याच्या यादीत समावेश करण्यासाठी परिपूर्र्ण प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Give space, try for the drafts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.