पाणी द्या, अन्यथा विमान उतरू शकणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:04 AM2021-05-09T04:04:12+5:302021-05-09T04:04:12+5:30

चिकलठाणा विमानतळावरील इमारतीत वेधशाळा आहे. विमानतळाच्या परिसरातच हवामान खात्याची निवासस्थाने आहेत. या ठिकाणी महापालिकेकडून आठवड्यातून ३ दिवस पाणीपुरवठा होतो. ...

Give water, otherwise the plane will not be able to land | पाणी द्या, अन्यथा विमान उतरू शकणार नाही

पाणी द्या, अन्यथा विमान उतरू शकणार नाही

googlenewsNext

चिकलठाणा विमानतळावरील इमारतीत वेधशाळा आहे. विमानतळाच्या परिसरातच हवामान खात्याची निवासस्थाने आहेत. या ठिकाणी महापालिकेकडून आठवड्यातून ३ दिवस पाणीपुरवठा होतो. विमानतळासमोर जालना रोडलगत असलेली जलवाहिनी फुटल्याने, या निवासस्थानांना गेल्या ८ दिवसांपासून पाणी येत नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधूनही प्रश्न सुटत नाही. वेधशाळेतील कर्मचाऱ्यांना, कुटुंबीयांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिसरातील अन्य लोकांकडून पाणी घेण्याची वेळ येत आहे. विमानतळ प्रशासनही पाणी देत नाही. विमानतळाकडून आधी पाणी पुरविले जात होते, पण ते बंद झाले. मनपाने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर कामबंद करू, असे हवामान सहायक सुनील निकाळजे म्हणाले. विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे म्हणाले, हवामान विभाग आमच्या अंतर्गत नाही. त्यांची निवासस्थाने विमानतळाच्या परिसरात आहे, पण या निवासस्थानांना मनपाकडून पाणीपुरवठा होतो.

Web Title: Give water, otherwise the plane will not be able to land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.