विहिरीत पडलेल्या ‘सायाळ’ला वन विभागाने दिले जीवदान

By Admin | Published: September 13, 2014 11:06 PM2014-09-13T23:06:17+5:302014-09-13T23:27:48+5:30

जामवाडी : जामवाडी येथील शेतकरी नारायण वाढेकर यांच्या विहिरीत शुक्रवारी रात्री पडलेल्या सायाळ या दुर्मिळ प्राण्याचे प्राण वाचविण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

Given the forest department's 'Saal' lying in the well | विहिरीत पडलेल्या ‘सायाळ’ला वन विभागाने दिले जीवदान

विहिरीत पडलेल्या ‘सायाळ’ला वन विभागाने दिले जीवदान

googlenewsNext


जामवाडी : जामवाडी येथील शेतकरी नारायण वाढेकर यांच्या विहिरीत शुक्रवारी रात्री पडलेल्या सायाळ या दुर्मिळ प्राण्याचे प्राण वाचविण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीमध्ये कोणता तरी मोठा पक्षी पडल्याचे शनिवारी सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलांना वाटले. विहिरीत पाहिल्यानंतर सायाळ प्राणी आहे असे समजले. वराहाच्या पिल्लासारखा व अंगावर धारधार काटे असलेला हा दुर्मिळ प्राणी असून हा पक्षी मासे खातो, असे वन परिक्षेत्र अधिकारी मोहन कासार यांनी सांगितले. डी.जी.शेजवळ यांनी वन कर्मचारी भास्कर भाटसोडे यांना जामवाडी येथे पाठविले. यावेळी कैलास वाढेकर, प्रल्हाद बडदे यांनी या प्राण्यास विहिरीबाहेर काढण्यास मदत केली. विहिरीबाहेर काढल्यानंतर हा प्राणी कुठलाही उपद्रव न करता शांतपणे शेतात निघून गेला. (वार्ताहर)

Web Title: Given the forest department's 'Saal' lying in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.