महालक्ष्मी सणावर जीएसटीचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:34 AM2017-08-29T00:34:28+5:302017-08-29T00:34:28+5:30
महालक्ष्मी सणानिमित्त येथील बाजारपेठेत सजावट आणि पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली आहेत. जीएसटी कराचा परिणाम या साहित्याच्या दरावर झाल्याने गतवर्षीपेक्षा सर्वच साहित्याचे भाव वाढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महालक्ष्मी सणानिमित्त येथील बाजारपेठेत सजावट आणि पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली आहेत. जीएसटी कराचा परिणाम या साहित्याच्या दरावर झाल्याने गतवर्षीपेक्षा सर्वच साहित्याचे भाव वाढले आहेत.
२९ आॅगस्टपासून जिल्ह्यात महालक्ष्मी सणाला प्रारंभ होत आहे. या सणासाठी महालक्ष्मीचे मुखवटे, हात, महालक्ष्मीसमोर ठेवले जाणारे सजावटीचे साहित्य, कोथळ्या, महालक्ष्मीचे मखर आदी साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. या सर्वच साहित्यांच्या दरावर जीएसटीचा परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. गतवर्षी कोथळ्यांचे भाव ७०० ते ८०० रुपयांपर्यंत होते. मात्र यावर्षी कोथळ्या बनविण्यासाठी लागणाºया कच्चा मालावर जीएसटी लागू झाल्याने १२०० रुपयांपर्यंत कोथळ्या विक्री केल्या जात आहेत. मखरही ३ हजार ते ४ हजार रुपये भावाने विक्री होत आहेत.
मखर तयार करण्यासाठी लागणारे पाईप, तोरणासाठी लागणारा कपडा जीएसटीसह खरेदी करावा लागत असल्याने भाव वाढल्याचे प्रशांत जैन यांनी सांगितले.
महालक्ष्मीच्या मुखवट्याच्या किंमतीत मात्र मागील वर्र्षीच्या तुलनेत फारसी वाढ झाली नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले.