डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मोठी झेप; नॅक मूल्यांकनात ‘अ+’ श्रेणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:03 AM2024-10-31T11:03:26+5:302024-10-31T11:03:56+5:30

सातजणांच्या टीमने विविध विभागांना भेट देत स्वयंमूल्यमापन अहवालानुसार तपासणी केली. 

Glorious! Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University got 'A+' grade in NAC assessment | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मोठी झेप; नॅक मूल्यांकनात ‘अ+’ श्रेणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मोठी झेप; नॅक मूल्यांकनात ‘अ+’ श्रेणी

छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास नॅककडून ‘अ +’ श्रेणी बहाल करण्यात आली आहे. विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी मिळविली होती. पूर्वी ३.२२ गुणांसह 'अ' श्रेणी होती. आता त्यात आता वाढ झाली असून ३.३८ गुणांसह ‘अ +’ श्रेणी मिळाली आहे.

विद्यापीठाचा स्वयंमूल्यमापन अहवाल (एसएसआर) मे महिन्यात अंतिम करून तो राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे पाठविला होता. त्यानंतर ‘नॅक पीअर टीम’ विद्यापीठात दाखल झाली. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी विभागप्रमुखांची बैठक घेत तयारीची उजळणी केली. पाच वर्षांनंतर संपूर्ण विद्यापीठाचे मूल्यांकन बंगळुरू येथील ‘पीअर टीम’ ने तीन दिवस केले. सातजणांच्या टीमने विविध विभागांना भेट देत स्वयंमूल्यमापन अहवालानुसार तपासणी केली. 

या सात निकषांवर भर
नॅक मूल्यांकनात सात निकषांवर भर देण्यात येतो. यामध्ये अभ्यासक्रमाचे पैलू, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन, संशोधन, नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिकण्याची संसाधने, विद्यार्थ्यांची प्रगती, शासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्ये आणि सर्वोत्तम पद्धती, आदींचा समावेश आहे. ‘नॅक’च्या निकषांचा विचार करीत विद्यापीठाने काही विभागांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे सांगण्यात येते. ज्यामध्ये २१ विभागांचा समावेश आहे. यासह कमवा व शिका योजना, ग्रंथालय अशा विस्तार सेवांवरही भर होता.

मूल्यांकन समितीमध्ये या सातजणांचा होता समावेश
मूल्यांकनासाठी प्रा. ए. एन. राय यांच्या अध्यक्षतेखालील ‘पिअर टिम’मध्ये प्रा. विमला एम या सदस्य समन्वयक आहेत. तसेच प्रा. विशाल गोयल, प्रा. रोव्हरू नागराज, प्रा. ग्यानेंद्र कुमार राऊत, प्रा. साबियासी सारखेल व प्रा. के. एस. चंद्रशेखर यांचा सदस्य म्हणून समावेश होता. २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान समितीने विद्यापीठातील विविध विभागांना भेट दिली. समितीने सकाळी ९ ते सायंकाळी नियोजित काम संपेपर्यंत पाहणी केली. यावेळी समितीने विद्यार्थी, संशोधक, माजी विद्यार्थी, पालक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, कर्मचारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, आदींशी संवाद देखील साधला.

Web Title: Glorious! Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University got 'A+' grade in NAC assessment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.