इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्तर्फे लोखंडे, काटवे यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:15 AM2019-03-19T00:15:54+5:302019-03-19T00:18:08+5:30
भोपाळ येथे इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्तर्फे २0१८-१९ या वर्षात असामान्य गुणवत्ताधारकांचा सत्कार करण्यात आला. त्यात औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विष्णू लोखंडे आणि स्मिता काटवे यांचाही यावेळी नुकताच गौरव करण्यात आला. स्मिता काटवे यांनी १५ आॅगस्ट २0१४ मध्ये एमजीएम येथे सलग १२ तास स्विमिंग केली होती.
औरंगाबाद : भोपाळ येथे इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्तर्फे २0१८-१९ या वर्षात असामान्य गुणवत्ताधारकांचा सत्कार करण्यात आला. त्यात औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विष्णू लोखंडे आणि स्मिता काटवे यांचाही यावेळी नुकताच गौरव करण्यात आला.
स्मिता काटवे यांनी १५ आॅगस्ट २0१४ मध्ये एमजीएम येथे सलग १२ तास स्विमिंग केली होती. या कामगिरीची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली होती. त्याचप्रमाणे विष्णू लोखंडे यांनी गतवर्षी १७ जून रोजी सलग १२ तास स्विमिंग करीत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् आणि आशिया बुक आॅफ रेकॉर्डस्मध्ये नोंद केली होती. या कामगिरीची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी इंडिया बुक आॅफ रेकार्डस्चे मुख्य संपादक डॉ. विश्वरूप रॉय चौधरी यांची उपस्थिती होती. या गौरवाबद्दल जिल्हा जलतरण संघटनेतर्फे अध्यक्ष विजय आघाव, सचिव अभय देशमुख, रुस्तुम तुपे, राजेश पाटील, संदीप जगताप, अश्विनी मार्कं डे, मोहंमद कदीर खान, एकनाथ शेळके, रवींद्र राठी, सुशील बंग, मुकेश बाशा आदींनी अभिनंदन केले.