भक्तिभावाशिवाय देव कळत नाही -रामगिरी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:35 AM2017-12-19T00:35:55+5:302017-12-19T00:36:53+5:30

भक्तिभावाशिवाय देव जसा कळत नाही, तसा गुरूशिवाय अनुभव मिळत नाही. गुरूशिवाय खरं ज्ञानही प्राप्त होत नाही. संतसाहित्यात संतांनाच त्यांच्या भक्तांनी गुरू मानलं आहे. म्हणूनच तर संतांचे संगती तरणोपाय, असं म्हटल्याप्रमाणे अज्ञानाच्या निद्रेतून जागे करणाºया संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले .

 God does not know without devotion - Ramgiri Maharaj | भक्तिभावाशिवाय देव कळत नाही -रामगिरी महाराज

भक्तिभावाशिवाय देव कळत नाही -रामगिरी महाराज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : भक्तिभावाशिवाय देव जसा कळत नाही, तसा गुरूशिवाय अनुभव मिळत नाही. गुरूशिवाय खरं ज्ञानही प्राप्त होत नाही. संतसाहित्यात संतांनाच त्यांच्या भक्तांनी गुरू मानलं आहे. म्हणूनच तर संतांचे संगती तरणोपाय, असं म्हटल्याप्रमाणे अज्ञानाच्या निद्रेतून जागे करणाºया संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले .
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान सराला बेटाचे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या ११५ व्या पुण्यतिथी महोत्सवात काल्याच्या कीर्तनात संत तुकाराम महाराज यांच्या गौळणीचे निरुपन महंत रामगिरी महाराजांनी केले. सांगता उत्सवाप्रसंगी डॉ. भागवत कराड, बाळासाहेब संचेती, माजी सभापती संतोष जाधव, युवासेनेचे संतोष माने, मोहनराव आहेर, रावसाहेब औताडे, मंदाताई कांबळे, अविनाश पाटील गलांडे, राजेंद्र चव्हाण, भाऊसाहेब झिंजुर्डे, बाळासाहेब कापसे, पंकज ठोंबरे, अशोक बोहार्डे, दत्तू खपके, भगवान महाराज धायडे, मधुकर महाराज आदींसह लाखो भाविकांची उपस्थिती होती.

Web Title:  God does not know without devotion - Ramgiri Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.