ईश्वर चराचरात आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:16 AM2018-12-20T00:16:53+5:302018-12-20T00:18:24+5:30

नरेंद्रचार्य महाराज : सिल्लोडमध्ये भक्तसागर लोटला; दर्शनासाठी गर्दी

 God is in the grasslands | ईश्वर चराचरात आहे

ईश्वर चराचरात आहे

googlenewsNext

सिल्लोड : ईश्वर चराचरात आहे. माणसाच्या सत्कर्माने त्याला देवपण प्राप्त करता येऊ शकते, यासाठी त्याचे कर्म महत्त्वाचे आहे. आपण जगत असताना दुसऱ्याला जगायला मदत करणे, हीच खरी मानवता आहे. त्यामुळे प्रत्येकाने चांगले कर्म करणे गरजेचे आहे, असा उपदेश जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज (नाणिज धाम) यांनी येथे केले. महाराजांच्या दर्शनासाठी सिल्लोडमध्ये भक्तसागर लोटला होता.
बुधवारी शहरातील भराडी रस्त्यालगत स्व. गोकुळचंद खिंवसरा सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कीर्तन, प्रवचन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी आयोजक राजेश खिंवसरा व त्यांच्या कुंटुबियांच्या वतीने महाराजांचे पाद्यपूजन करण्यात आले.  
तुम्ही बुध्दीचा कसा वापर करता, यावर त्याचे फलीत अवलंबून आहे. देवादिकांना देखील चुकीने केलेल्या गोष्टीचे प्रायश्चित भोगावे लागले असेल तर तुम्ही आम्ही कोण, माणसाचे शरीर हे नश्वर असून आत्मा अमर आहे. त्यामुळे मोह माया याचा त्याग केला तरच तुम्ही ईश्वरप्राप्ती करु शकता, असा उपदेश महाराजांनी केला.
सुमारे अडीच तास केलेल्या उपदेशात जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांनी आपला श्री संप्रदाय हा परिवार असून भक्ताने दिलेल्या हाकेला धाऊन जातो, असे सांगत सच्चा मनाने हाक द्या, मी धाऊन येईल, असे सांगितले. महाराजांच्या दर्शन व प्रवचन सोहळयास लाखो भाविक विशेषत: महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नरेंद्रचार्य महारांजाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

Web Title:  God is in the grasslands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.