भगवान महावीर जयंती बजाजनगरात उत्साहात
By Admin | Published: April 20, 2016 12:29 AM2016-04-20T00:29:58+5:302016-04-20T00:47:18+5:30
वाळूज महानगर : जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती बजाजनगर व पंढरपूरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
वाळूज महानगर : जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती बजाजनगर व पंढरपूरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आल्याने भक्तिभावाचे मंगलमय सूर ऐकू येत होते.
सकल जैन समाजातर्फे सकाळी ६.३० वाजता पंढरपुरातील महावीर चौकात धर्मध्वजारोहण करून शहरातील महावीर स्तंभापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पंढरपूर जैन स्थानक ते बजाजनगरातील महावीर भवनापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. येथील महावीर भवनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी भाविकांत चैतन्य व उत्साह दिसून आला. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर नवकार महामंत्र, कलशपूजन करून या कलशाची बोली लावण्यात आली. ही बोली जि.प. सदस्य अनिल चोरडिया यांनी घेतली. पंढरपूर जैन श्रावक संघातर्फे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान व मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाने (गौतम प्रसादी) कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास अनिल चोरडिया, श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष चोरडिया, उपाध्यक्ष किशोर राका, सतीश शिंगी, अॅड. महावीर कांकरिया, पंढरपूरचे सरपंच गौतम चोपडा, चंद्रकांत चोरडिया, शशिकांत कोठारी, ग्रा.पं. सदस्य अमित चोरडिया, सुमित कुचेरिया, सागर चोरडिया, डॉ. प्रवीण तातेड, मयूर चोरडिया, गिरीश दुग्गड, प्रवीण बोरा, मिश्रीलाल चोरडिया, सुनील जैन, मनोज कटारिया, किरण नहार, नरेश ललवाणी, चेतन छाजेड, जितेंद्र बेदमुथा, मनोज मंडलेचा, रवींद्र बेदमुथा, प्रफुल्ल तातेड यांच्यासह सकल जैन बांधव-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.