पैठणचा गोदाकाठ ११ हजार दिव्यांनी उजळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:26 AM2018-01-28T00:26:21+5:302018-01-28T00:26:28+5:30

गोदावरी प्रकट दिनाच्या मुहूर्तावर शनिवारी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने पैठण येथील गोदावरीच्या नाथ घाटावर ११ हजार दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी पैठणनगरीत एकच गर्दी केली होती.

 The goddess of Paithan was lighted by 11 thousand lamps | पैठणचा गोदाकाठ ११ हजार दिव्यांनी उजळला

पैठणचा गोदाकाठ ११ हजार दिव्यांनी उजळला

googlenewsNext

पैठण : गोदावरी प्रकट दिनाच्या मुहूर्तावर शनिवारी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने पैठण येथील गोदावरीच्या नाथ घाटावर ११ हजार दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी पैठणनगरीत एकच गर्दी केली होती.
याप्रसंगी आ. संदीपान भुमरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या हस्ते गोदावरीची पूजा करून खण-नारळाने ओटी भरण्यात आली. गोदावरीचा प्रकट दिन माघ शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर साजरा करण्यात आला. दैनिक वीणेकरी भक्त संघटना व दैनिक गोदावरी आरती भक्तमंडळाच्या वतीने गोदावरी पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. महेश शिवपुरी यांच्या मंत्रघोषात दादा तांगडे, शंकर थोरात, दगडूनरके, सजन मुळे, सावळाराम लोहकरे, एकनाथ सोनवणे, ज्ञानेश्वर मुंडे, हरिभाऊ भुकेले, बालासाहेब थोरात, रामराव पठाडे, ज्ञानेश्वर वाघ, दगडू नजन, तुकाराम कर्डिले, कडूजन गाडेकर, बाबुराव ढवळे, पुष्पा गव्हाणे, छाया देशपांडे, जयश्री कावसानकर, सुलोचना दानशूर, कीर्ती शिवपुरी, मनीषा कुलकर्णी, ललिता खिस्ती, प्राची कावसानकर, जयश्री भावसार, सुनंदा वैष्णव, चंद्रकला जानकर, अनसूया सोनवणे, सुरेश अंबाडे, तुकाराम पोकळे, अण्णासाहेब डाके यांच्यासह अनेकांनी गोदावरी मातेची पूजा केली.
याप्रसंगी बंडेराव जोशी, दिनेश पारीख आदींची प्रवचने झाली. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. तत्पूर्वी गोदावरी प्रकट दिनानिमित्त पहाटेपासूनच गोदावरीत स्नान करण्यासाठी भाविक वर्ग लोटला होता. श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकºयांनी प्रकट दिनानिमित्त गोदावरी मातेचे पूजन करून ओटी भरली. पहाटे गागाभट्ट चौकातील प्राचीन तथा ऐतिहासिक गंगामंदिरामध्ये गंगामूर्तीचाही महाभिषेक पुजारी प्रदीप महेशपाठक व सुयश शिवपुरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी बालवारकºयांसह भक्तांनी भावगीते, अभंग व भजने गाऊन गंगामंदिर दुमदुमून टाकले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश पाठक, स्वप्नील पिंपळकर, एकनाथ धूत, किरण भावसार, दीपक लिंबोरे, तुकाराम लिंबोरे, रामभाऊ जमादार, भीमसिंग बुंदिले, विष्णू ढवळे, जगन्नाथ जमादार, राजेंद्र पाठक, रवींद्र पांडव, रमेश जाधव, शुभम् जगताप आदींनी परिश्रम घेतले.
गोदाकाठी भक्तांचा मेळा
गोदावरीचे मुखस्थान म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची प्रकट दिनानिमित्त हजारो भाविकांनी दिवसभर पवित्र स्नान करून गोदापात्रात पुष्प अर्पण करून दीप दान केले. दरम्यान, दीप प्रज्वलनप्रसंगी समाजभान प्रतिष्ठानचे धोंडिभाऊ पुजारी, पोनि. चंदन इमले, नगराध्यक्ष सूरज लोळगे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, नगरसेवक तुषार पाटील, स्वच्छता सभापती ईश्वर दगडे, अश्विनी लखमले, सरपंच साईनाथ सोलाट, शेखर शिंदे, राणा मापारी, सचिन उंडाळे, शिवा भाग्यवंत, शिवा पारिख, कैलास बरकसे, मंगेश कुलकर्णी, योगराज बुंदिले, शिवाजी पठाडे यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती.
पैठणच्या गोदामातेचे वैशिष्ट्य
संत एकनाथ महाराज व संत अमृतरायांनी गोदावरीच्या जलात जिवंत समाधी घेतली आहे. श्रीखंड्या या नावाने भगवान श्रीकृष्ण नाथांच्या घरी अन्नदानासाठी दररोज कावडीने रांजणात पाणी भरीत व गोदावरीवर स्नान करण्याचा आनंद लुटत. गोदावरी माता स्त्री रूपात नाथांचे कीर्तन ऐकण्यासाठी अधून-मधून नाथवाड्यावर हजेरी लावत. पैठणला गोदावरी दक्षिणवाहिनी प्रवाहित झाल्यामुळे तिचे विशेष असे महत्त्व आहे. तसेच ‘गोदावरीत स्नान केल्यामुळे पापमुक्त होतो’ अशी धारणा असल्याने लोक स्नानासाठी गर्दी करतात.

Web Title:  The goddess of Paithan was lighted by 11 thousand lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.