ईश्वरप्राप्ती हेच मानवी जीवनाचे उद्दिष्ट असावे
By Admin | Published: January 17, 2016 11:48 PM2016-01-17T23:48:30+5:302016-01-17T23:57:03+5:30
औरंगाबाद : भगवंत श्रीरामाची कथा हे शिकविते की, ईश्वरप्राप्ती हे मनुष्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असावे, असे विचार महामनस्विनी विदूषी सुश्री प्रवीणा भारती यांनी येथे व्यक्त केले.
औरंगाबाद : भगवंत श्रीरामाची कथा हे शिकविते की, ईश्वरप्राप्ती हे मनुष्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असावे, असे विचार महामनस्विनी विदूषी सुश्री प्रवीणा भारती यांनी येथे व्यक्त केले.
दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने आयोजित श्रीरामकथा ज्ञानयज्ञाला रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला. त्यावेळी ‘श्रीरामचरित मानस माहात्म्य व सती प्रसंग’ याची कथा प्रवीणा भारती यांनी सांगितली. रामकथा ऐकण्यासाठी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मैदानावर भाविकांनी गर्दी केली होती. प्रारंभी, अॅड.दत्तात्रय गोधनगावकर, सुवालाल नाबरिया, रामविलास सोनी, संघवी, अशोक भबर, धर्मराज आडे, नारायण राठी, अनंत जैस्वाल, छाया अग्रवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. धर्मपीठावर आशुतोष महाराजांचे छायाचित्र लावण्यात आले होते. १८ रोजी रामजन्म आणि बाललीला, १९ रोजी सीता स्वयंवर, २० रोजी दोन वरदान आणि राम वनवास, २१ रोजी शबरी प्रसंग, २२ रोजी किष्किंधा कांड, तर २३ रोजी बिभीषण शरणागती, रावण वध आणि दिवाळी अशा कथा सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजेदरम्यान सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
श्रीरामकथा ज्ञानयज्ञाअंतर्गत रविवारी सकाळी ११ वाजता कलश यात्रा काढण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे या कलश यात्रेत सहभागी झाले होते.