देशसेवेवर जाण्याआधी जवानाने केली ५१ वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:04 AM2021-07-21T04:04:42+5:302021-07-21T04:04:42+5:30
उंडणगाव : सैन्य दलात आपले प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेच्या कर्तव्यावर जाण्याअगोदर उंडणगाव येथील एका जवानाने विविध जातींच्या ५१ कलमांची ...
उंडणगाव : सैन्य दलात आपले प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेच्या कर्तव्यावर जाण्याअगोदर उंडणगाव येथील एका जवानाने विविध जातींच्या ५१ कलमांची लागवड करून पर्यावरणाचा संदेश दिला आहे. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.
स्वप्निल ईश्वर लांडगे हा युवक मागीलवर्षी सैन्य दलात भरती झाला होता. त्याचे नुकतेच बेंगलोर येथे प्रशिक्षण आटोपून तो पंधरा दिवसांच्या सुटीवर गावी आला. त्याने सोमवारी आपल्या देशसेवेच्या कर्तव्यावर जाण्यापूर्वी गावातील श्री गजानन महाराज मंदिराच्या परिसरात ५१ वृक्षांची लागवड केली. तसेच गावातील अन्य युवकांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.
याप्रसंगी माजी उपसरपंच पंकज जयस्वाल, ग्रा.पं. सदस्य नागेश लांडगे, जगत धनवई, राष्ट्रीय बालकीर्तनकार अशोक महाराज सुरडकर, दिलीप बाबा लांडगे, सूर्यकांत कौशल्ये, योगेश जयस्वाल, विठ्ठल महाराज, ईश्वर लांडगे, नारायण सुरडकर, गोपाल वाघ, आशिष लांडगे आदींची उपस्थिती होती.
200721\1914-img-20210720-wa0051.jpg
देशसेवेवर जाण्याआधी जवानाने केले ५१ वृक्षांची लागवड