वाडीवस्तीवर जात शिक्षकांनी अखंड ठेवला शिक्षणाचा नंदादीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:04 AM2021-07-26T04:04:32+5:302021-07-26T04:04:32+5:30
कन्नड : कोरोनाच्या सावटाखाली गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. कन्नड येथील ...
कन्नड : कोरोनाच्या सावटाखाली गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. कन्नड येथील न्यू हायस्कूलच्या शिक्षकांनी विद्यार्थिहितासाठी एकत्र येत ज्ञानदानाचा अखंड दिवा तेवत ठेवला. गावोगावी जाऊन शेतवस्ती, गावातील मंदिराच्या परिसरात बसून ते ज्ञानदान करीत आहेत. या उपक्रमामुळे अनेक महिन्यांपासून शिक्षणाचा विसर पडलेल्या व नैराश्याच्या गर्तेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची अनुभूती येत आहे.
शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण पवार, सदस्य शेकनाथ चव्हाण, कृष्णा जाधव, सुनील पवार, एस.जी. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू हायस्कूलचे शिक्षक रेल तांडा, रिठी, डाबरखोरा, मोहडा या खेडोपाडी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन, विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एम.एम. कसबे, डी.एस. कवडे, जे.ए. पवार, ए.बी. सारंगधर, वाय.आर. पवार, डी.सी. मिस्तरी, एस.व्ही. करवंदे, ए.एस. मनगटे या शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे, तर गावोगावी पालक व गावकऱ्यांकडूनदेखील सहकार्य मिळू लागल्याने शिक्षकांच्या या कार्याचे कौतुक होऊ लागले आहे.