पाउण किलो दागिने लुटणारा अट्टल गुन्हेगार २४ तासात अटकेत; भरदिवसा केली होती घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 02:51 PM2019-06-15T14:51:04+5:302019-06-15T15:15:45+5:30
आरोपीकडून ७१ तोळे सोन्याचे दागिने आणि पाउण किलो चांदी जप्त केली .
औरंगाबाद: वैजापूर येथील व्यापाऱ्याचे घर भरदिवसा फोडून पाउण किलो सोन्याचे दागिने आणि रोकड पळविणाऱ्या अटट्ल चोरट्याला ग्रामीण पोलिसांनी चौविस तासात अटक केली. आरोपीकडून ७१ तोळे सोन्याचे दागिने आणि पाउण किलो चांदी जप्त केली .
किशोर तेजराव वायळ (वय ३८,रा .मेरा , ता चिखली, जिल्हा बुलढाणा)असे अटकेतील आरोपी चे नाव आहे . याविषयी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांनी पत्रकार परिषदमध्ये ही माहिती दिली . ते म्हणाले की वैजापूर येथील प्रकाश लालचंद छाजेड यांचे भाउ ऋषभ आणि भावजय ११ते १३ जुनदरम्यान कामानिमित्त अहमदनगर आणि पुणे येथे गेले होते . १२ रोजी त्यांच्या घरी गुरू महाराज आल्याने त्याचे सर्व कुटुंब महाराजांच्या सेवेत होते यामुळे ऋषभच्या घरी असलेली त्यांची आई घराला कुलुप लावून प्रकाश यांच्याकडे आली होती .१२ रोजी दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान चोरट्यानी ऋषभ च्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यानी रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते.
याबाबत प्रकाश यांनी वैजापुर ठाण्यात तक्रार नोंदविली होती . यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील . अप्पर अधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे , फौजदार भगतसिंग दुल्हत , सहायक फौजदार पठाण, पोहेकॉ विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे , किरणगोरे , योगेश तरमाळे , जीवन घोलप , योगेश दारवंटे आणि चालक संजय तांदळे यांनी घटनास्थळीभेट देउन तपास केला तेंव्हा ही चोरी अट्ट्ल चोर वायाळ ने केल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी साखरखेर्डा ते बुलढाणा रस्त्यावर सापळा रचून वायाळला पकडले. त्याने गुंह्याची कबुली देत हि चोरी साथीदारआकाश प्रकाश पवार याच्या सोबत केल्याचे सांगितले .चोरलेले सर्व दागिने आणि रोकड तसेच चोरी करण्यासाठी वापरलेली लोखंडी टॉमी त्याने काढून दिली .