झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:46 AM2017-10-01T00:46:24+5:302017-10-01T00:46:24+5:30
पावसाने जिल्ह्यातील झेंडू खराब झाल्यामुळे झेंडूच्या फुलांचे भाव गगनाला जाऊन भिडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पावसाने जिल्ह्यातील झेंडू खराब झाल्यामुळे झेंडूच्या फुलांचे भाव गगनाला जाऊन भिडले होते. दरवर्षी ३० ते ५० रुपये किलोप्रमाणे मिळणारा झेंडू यंदा दसºयाच्या दिवशी चक्क २०० ते ३०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. पहिल्यांदाच झेंडूला एवढा विक्रमी भाव मिळाला. स्थानिक थोडेफार शेतकरी वगळता परजिल्ह्यांतून झेंडूची फुले शहरात आणून विक्री करणाºया व्यापाºयांचा फायदा झाला.
यंदा सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील झेंडू काळवंडला होता. यामुळे रंगदार झेंडू भाव खाऊन गेला. जिल्ह्यातील झेंडूची बिकट परिस्थिती लक्षात घेता चाणाक्ष व्यापाºयांनी हिंगोली, परभणी, जळगाव जिल्ह्यांतून झेंडूची फुले आणून येथे विकली.
दसºयाच्या आदल्या दिवशी ८० ते १०० रुपये किलोने झेंडू विकला जात होता; पण आज दसºयाला सकाळी नगरहूनही झेंडूची कमी आवक झाल्याने झेंडूचा भाव वाढून २०० रुपये तर काही भागात ३०० रुपये किलोपर्यंत विकल्या गेला. एवढेच काय पण दुपारी १ वाजेपर्यंत मुकुंदवाडी, चिकलठाणा, जालना रोड, शहागंज, सिडको-हडको, बीड बायपास रोड परिसरात रस्त्यावर ढीग मांडून बसलेल्या विक्रेत्यांकडील झेंडूची फुले संपली होती. दुपारनंतर भाव कमी होतील, या आशेने अनेक जण जेव्हा दुपारी खरेदीला बाहेर पडले तेव्हा त्यांना झेंडूचे दर्शनच झाले नाही. सर्वत्र आपट्याची पाने विकणारे विक्रेते दिसून येत होते. या भाववाढीचा फायदा काही शेतकºयांनाच झाला, पण या ‘व्यापाºयांनी’ चांदी करून घेतली. परजिल्ह्यांतून झेंडू आणून येथे विक्री करणाºया व्यापाºयांनी तिप्पट नफा कमावला, हेच यामागील सत्य होय.