गणेश पंचायतन यागाने सुवर्णमहोत्सवी वर्षाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:05 AM2021-01-22T04:05:07+5:302021-01-22T04:05:07+5:30
औरंगाबाद : समर्थनगरातील वरद गणेश मंदिरात गुरुवारी गणेश पंचायतन याग करून सुवर्णमहोत्सवी वर्षाला सुरुवात झाली. मंदिर स्थापनेचे ५० वे ...
औरंगाबाद : समर्थनगरातील वरद गणेश मंदिरात गुरुवारी गणेश पंचायतन याग करून सुवर्णमहोत्सवी वर्षाला सुरुवात झाली.
मंदिर स्थापनेचे ५० वे वर्षे साजरे करताना विविध धार्मिक, सामाजिक कार्यकम राबविण्यात येणार आहेत. सुवर्ण महोत्सवच्या पहिल्या कार्यक्रमाला गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. यात गणेश सभेचे अध्यक्ष यजमान मनोज पाडळकर व मंजिरी पाडळकर हे यागाला बसले होते.
यागाच्या पूर्णाहुतीसाठी खास काशी येथील पंडित प्रवर गणेश्वर शास्त्री व गुणेश पारनेरकर यांची उपस्थिती होती. त्यांचे विचार ऐकण्यासाठी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने होते.
तत्पूर्वी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यासाठी निधी संकलन समितीला गणेश सभेतर्फे २ लाख ५१ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. सोहळा यशस्वीसाठी मंदिराचे अनिल देशमुख, विवेक श्रीकांत, अनिल वाळुंजकर, देवेंद्र देव, सुनील खोचे, प्रकर्ष पिंगे, सुभाष खोचे, निर्मला तरटे, श्रीकांत जोशी, डॉ. अनंत बीडकर, मयुरेश कोटणीस, निशा छापेकर, नितीन कुलकर्णी, प्रकाश राशनीकर यांनी परिश्रम घेतले.