औरंगाबादच्या रोहन टाक याची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:31 AM2018-01-30T00:31:53+5:302018-01-30T00:32:07+5:30

औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू रोहन टाक याने जबरदस्त कामगिरी करताना सलग दुसºया वर्षी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली. अकोला येथे नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहन टाक याने हरियाणाच्या खेळाडूला धूळ चारताना सुवर्णपदकावर कब्जा मिळवला. रोहन टाक याने या स्पर्धेत १९ वर्षांखालील ८१ ते ९१ किलो वजन गटात आपला विशेष ठसा उमटवताना केंद्रीय विद्यालय, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशच्या खेळाडूंना धूळ चारताना दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.

 Golden performance in National Boxing Championship by Rohan Tak of Aurangabad | औरंगाबादच्या रोहन टाक याची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी

औरंगाबादच्या रोहन टाक याची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी

googlenewsNext
ठळक मुद्देअकोला येथे जिंकले सुवर्ण : महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक योगदान

औरंगाबाद : औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू रोहन टाक याने जबरदस्त कामगिरी करताना सलग दुसºया वर्षी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली. अकोला येथे नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहन टाक याने हरियाणाच्या खेळाडूला धूळ चारताना सुवर्णपदकावर कब्जा मिळवला.
रोहन टाक याने या स्पर्धेत १९ वर्षांखालील ८१ ते ९१ किलो वजन गटात आपला विशेष ठसा उमटवताना केंद्रीय विद्यालय, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशच्या खेळाडूंना धूळ चारताना दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीतही रोहन टाक याने त्याचा हरियाणाच्या प्रतिस्पर्ध्यांवर शक्तिशाली ठोशांचा वर्षाव करताना ५-0 अशा गुण फरकाने विजय मिळवताना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत रोहन टाक याच्याशिवाय अकोला येथील अजय पेंडूर (४९ किलो), राहील सिद्दीकी (६९ किलो) आणि पुणे येथील आकाश मनारे (६0 किलो) यांनीदेखील महाराष्ट्रासाठी सुवर्णपदके जिंकली.
विशेष म्हणजे रोहन टाक याचे राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेतील हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले. त्याने याआधी गतवर्षी ग्वाल्हेर येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. रोहन टाक याची भारतीय संघातील निवडही थोडक्यात हुकली होती. औरंगाबाद येथील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात झालेल्या संभाव्य भारतीय संघाच्या शिबिरात त्याची निवड झाली होती आणि अंतिम फेरीत त्याला सेनादलाच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध अवघ्या १ गुणाने निसटता पराभव पत्करावा लागला होता. रोहन टाकने सातारा येथे राज्यस्तरीय फेडरेशन स्पर्धा आणि अकोला येथील शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. विशेष म्हणजे रोहन टाक याने गोल्डन कामगिरी करताना अकोला येथील राष्ट्रीय स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात महाराष्ट्राला विजेतेपद पटकावून देण्यात निर्णायक योगदान दिले. रोहन टाक याला एनआयएस प्रशिक्षक सोनू टाक व राहुल टाक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष व औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष केजल भट्ट, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष विनोद नरवडे, उदय डोंगरे, कोषाध्यक्ष आरोह बर्वे, प्रदीप खांडरे, नीरज भारसाखळे आदींनी रोहन टाक याचे अभिनंदन केले.

Web Title:  Golden performance in National Boxing Championship by Rohan Tak of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.