वरद गणेश मंदिरात सुवर्णजडीत सिंहासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:05 AM2021-01-18T04:05:21+5:302021-01-18T04:05:21+5:30
औरंगाबाद : शहरवासियांचे श्रद्धेचे ठिकाण असलेल्या समर्थनगर येथील वरद गणेश मंदिराचा यंदा ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार ...
औरंगाबाद : शहरवासियांचे श्रद्धेचे ठिकाण असलेल्या समर्थनगर येथील वरद गणेश मंदिराचा यंदा ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गणपतीला सुवर्णजडीत सिंहासन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत अध्यक्ष मनोज पाडळकर यांनी सांगितले की, सुवर्णमहोत्सवी वर्षाची सुरुवात २१ जानेवारी रोजी गणेश पंचायतन यागने करण्यात येत आहे. योगाच्या पूर्णाहुतीसाठी काशीचे पंडित प्रवर गणेश्वर शास्त्री द्रविड यांची उपस्थिती असणार आहे. गणेश जयंतीनिमित्त वरद गणेश मूर्तीला सुवर्णजडीत सिंहासन करण्यात येणार आहे. यात सागवान लाकडाच्या सिंहासनाला ४० किलो चांदी व दीड किलो सोने लावण्यात येणार आहे. यंदा अन्नछत्रालय सुरू करण्यात येणार आहे. कॉलेजमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दत्तक योजना राबिवण्यात येणार आहे. वेद अभ्यास केंद्र,अभ्यासिका, गोशाळा आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पाडळकर यांनी नमूद केले. यावेळी अनिल देशमुख, विवेक श्रीकांत, सुनील खोचे, प्रकर्ष पिंगे, सुभाष खोचे, मयुरेश कोटणीस, निशा छापेकर, नितीन कुलकर्णी, प्रकाश राशनीकर यांची उपस्थिती होती.