‘गोल्डन ट्रँगल’ एक वर्षानंतर
By Admin | Published: May 10, 2016 12:45 AM2016-05-10T00:45:53+5:302016-05-10T01:00:28+5:30
विकास राऊत , औरंगाबाद दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला ‘गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगल’मध्ये आणण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा
विकास राऊत , औरंगाबाद
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला ‘गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगल’मध्ये आणण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला आहे. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर)नंतर भूसंपादन, अंदाजपत्रके आणि मग कंत्राटदार निश्चिती अशा टप्प्यांतून जाण्यासाठी ‘गोल्डन ट्रँगल’ला कागदावरून जमिनीवर येण्यासाठी १ वर्षाचा काळ लागणार आहे.
डिसेंबर २०१५ मध्ये त्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची थाटात कोनशिला लावण्यात आली असली तरी ग्राऊंडवर काम सुरू होण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती नशॅनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या प्रशासकीय सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ, नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) या तीन संस्थांच्या समन्वयाने ती कामे होणार आहेत. सध्या तरी एनएचएआय ही संस्थाच सर्वांसमोर काम करीत असल्याचे दिसते. भूसंपादन मोठा विषय असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वात मोठी भूमिका यात आहे; परंतु जिल्हाधिकारी कार्यालय या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करीत आहे.
राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग विकासाचा तो कार्यक्रम आहे. आगामी काही वर्षांत डीएमआयसी आणि एनएचडीपीमुळे मराठवाडा आणि औरंगाबाद शहर देशातील महत्त्वाचा विकसित भौगोलिक प्रदेश म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी गुंतवणूक दळणवळण सुधारण्यासाठी होत आहे. शहराला ऐतिहासिकेसोबतच ट्रान्स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सिटी म्हणूनही ओळख मिळू शकेल.
वाहतूक विकासासाठी ७-फेसचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आजवर विविध कार्यक्रमांतर्गत रस्ते विकसित करण्यात आले. या नवीन विकास कार्यक्रमाला ‘भारतमाला’ असे नाव देण्यात आले आहे. पूर्वीच्या ७ कार्यक्रमांपैकी ३ टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात औरंगाबाद व सीआरएफ (सेंट्रल रोड फंड वर्क्स)च्या रस्ते विकासाला प्रारंभ होईल. सीआरएफमधील रस्ते राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येतील, तर एनएचएआय (नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्याकडे एनएचडीपीअंतर्गत निर्माण होणाऱ्या रस्त्यांचे नियंत्रण राहील.
जालना रोड सध्या सहापदरी असून, त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येडशी-औरंगाबाद ते धुळे महामार्गाच्या कामातच ९ कि़मी. अंतराच्या जालना रोडचे काँक्रिटीकरण होणार आहे. या कामात भूसंपादनाचा खोडा निर्माण झाल्याने मुहूर्त केव्हा लागणार हे सांगता येणे शक्य नाही.
४राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ औरंगाबाद शहर चौपदरीकरण येडशी-औरंगाबाद ते धुळे आणि इतर रस्त्यांचे एकत्रित काम करण्यात येणार आहे. जालना रस्ता हा केम्ब्रिज शाळा ते नगर नाका असा १४.५ कि.मी. लांब व ४५ मीटर रुंदीचा दहा पदरी रस्ता व बीड रोडवरील झाल्टा फाटा ते पैठण रोडवरील महानुभाव आश्रम या रस्त्याचेही विस्तारीकरण याच योजनेत होणार असून, हा प्रकल्प ८५० कोटींचा आहे.